रायगड: जि. प. शाळा झाली डिजिटल, विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

अमित गवळे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने प्रगत शाळा सिध्दी या नव्या उपक्रमाअंतर्गत तंत्रस्नेही, इलर्निंग, इ क्लास या संकल्पनेवर भर दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना डिजिटल शाळांचे स्वरुप देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण बदल होत आहेत.

पाली : सुधागड तालुक्यातील रा. जि. प. केद्रशाळा पेडलीच्या डिजिटल शाळेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी सॅम मित्र मंडळ पेडली यांच्या योगदानातून विद्यार्थ्यांना टॅबचे देखील वाटप करण्यात आले. 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने प्रगत शाळा सिध्दी या नव्या उपक्रमाअंतर्गत तंत्रस्नेही, इलर्निंग, इ क्लास या संकल्पनेवर भर दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना डिजिटल शाळांचे स्वरुप देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार सर्व शाळा अत्याधुनिक व डिजिटल होणे काळाची गरज असल्याचे ओळखून शिक्षक, पालक, ग्रामस्त व लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या गावातील शाळा डिजिटल झाली पाहिजे याकरीता योगदान देत आहेत.

पेडली येथील सामाजिक, शैक्षणिक व सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले सॅम मित्र मंडळाने विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप केले. त्यामुळे सॅम मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सभासदांचे शाळाव्यवस्थापन समितीसह शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत. या टॅबच्या सहाय्याने विद्यार्थी ज्ञानकण गिरवीणार आहेत. या कार्यक्रमात दशरथ आण्णा, गणपतराव तळेकर, सुदाम मेने, सुमन शिंदे, रविंद्र खामकर, चंद्रकांत शिंदे, शर्मा, भरत तळेकर, ऍड. सागर तळेकर, केंद्र प्रमुख हाके सर, मुख्याध्यापक सुनिल कुवर, सह शिक्षिका मराठे मॅडम, सॅम मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन खामकर, उपाध्यक्ष प्रणित कडू, सचिव विजय देशमुख, दर्शन तळेकर, खजिनदार नंदकुमार शिंदे, सौरभ खामकर, रमेश पाटील, विक्रम देशमुख, सुरक कडू, शिवराज खामकर, राज तळेकर, बजरंग कुर्ले, राजेश शिंदे आदिंसह सॅम मित्र मंडळाचे सर्व सदस्य, ज्ञानेश्वर माउली महिला मंडळ व पेडली ग्रामस्त मंडळ उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :