रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी आदिती तटकरे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या आदिती तटकरे विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या स्वाती नवगणे यांचा 20 मतांनी पराभव केला. आदिती तटकरे यांना 38; तर नवगणे यांना 18 मते मिळाली. या निवडणुकीत कॉंग्रेसने आघाडीच्या बाजूने मतदान केले, तर भाजप सदस्य गैरहजर होते. आदिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. 

जिल्हा परिषदेच्या 59 पैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस 12, शेकाप 23, शिवसेना 18, कॉंग्रेस 3, भाजप 3 असे बलाबल आहे. यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस-शेकाप आघाडीच्या उमेदवारांचा विजय होणार, हे निश्‍चित होते. 

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शेकापचे आस्वाद पाटील व शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. यामध्ये आस्वाद पाटील यांना 38, तर सुरेंद्र म्हात्रे यांना 18 मते मिळाली. कॉंग्रेसच्या तीन सदस्यांनी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. 

Web Title: Raigad Zilla Parishad president Aditi Tatkare