पावसाचा जोर कायम, दस्तुरी नाका परिसरात पाणी

Rain continues, water in Dasturi Naka area
Rain continues, water in Dasturi Naka area

महाड- पावसाची संततधार अद्याप सुरूच असून महाड मध्ये सावित्री आणि गांधारी नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीजवळ आल्या आहेत. महाड जवळ असलेल्या दस्तुरी नाका ते नाते खिंड या मार्गावर आज सकाळी पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. महाबळेश्वर मध्ये देखील एका दिवसात 298 मि.मी. पावसाची नोंद झाल्याने सावित्री नदीच्या पाण्याची पातळी 6.25 मी. पर्यंत पोहचली होती. 

महाडमध्ये आठवडाभर मुसळधार पाऊस सुरुच आहे. रविवारी रात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने सावित्री, गांधारी, आणि काळ नद्यांची पातळी वाढली. सकाळी सावित्री नदीचे पाणी महाड शहराजवळील दस्तुरी नाका ते नाते खिंड या मार्गावर आल्याने हा मार्ग वाहतुकीस पोलीस प्रशासनाने बंद केला. पावसाचा सूर पाहून महाड तालुक्यातील शाळा देखील आज सकाळीच सोडून देण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर महाड मधील आपत्ती निवारण पथक देखील सज्ज झाले आहे.

तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने घरे व इमारतींना धोका निर्माण झाला असुन तालुक्यातील खुटील हनुमानवाडी येथे पावसामुळे घर कोसळले आहे. पोलादपूर येथे देखील 135 मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. सावित्री नदीचे उगमस्थान महाबळेश्वर असुन तेथून पोलादपूर अशी नदी वाहत असल्याने यथील पावसाचा परिणामही नदीची पातळी वाढण्यावर होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com