हापूस आंबा
हापूस आंबाsakal

राजापूर : बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल झालेला हापूस आंबा

बाजारपेठेत आवक कमी; ३०० रुपये डझन

राजापूर: प्रतिकूल हवामान, अवकाळी पावसाचे दुष्टचक्र कायम आहे. त्यातूनही तरलेला आणि परिपक्व झालेल्या आंब्याची तोड होवू लागली असली तरी हा आंबा देशासह परदेशामध्ये विक्री होत आहे. स्थानिक बाजारपेठेमध्ये म्हणावा तसा हापूस दाखल झालेला नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतका आंबा स्थानिक बाजारपेठेत दाखल झाला आहे. स्थानिक अद्यापही हापूसच्या रसाळ आणि मधुर चवीपासून दूर राहिलेले आहेत. स्थानिक बाजारपेठेमध्ये काही मोजक्या व्यापाऱ्‍यांकडून हापूस आंब्याची विक्री केली जात आहे. ३०० रुपये डझनाने त्याची विक्री केली जात आहे. आंब्याची बिटकी १६० रुपये प्रतिकिलो विकली जात आहे.

मुबलक प्रमाणात हापूस मेमध्ये

दुष्टचक्राच्या फेऱ्‍यातून वाचलेल्या हापूस आंब्याची तोड सुरू असून हा आंबा देशी-परदेशामध्ये विकला जात आहे. त्यातून फारसा नफा मिळण्याऐवजी झालेला खर्च निघण्याएवढे उत्पन्न शेतकरी, बागायतदारांना मिळताना दिसत आहे. स्थानिक बाजारपेठेमध्ये मुबलक प्रमाणात हापूस दाखल होण्यासाठी मे महिना उजाडणार आहे.

एक नजर..

हापूस आंब्याची विक्रीः ३०० रुपये डझन

आंब्याची बिटकीः १६० रुपये प्रतिकिलो

पेटी ४ डझनः १२०० रूपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com