८३ हजार रेशन कार्डे आधार लिंकविना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

राजापूर - कॅशलेस व्यवहारासाठी तालुक्‍यातील सर्व रेशनिंग कार्डवरील लाभार्थी आधार लिंकद्वारे जोडण्याचे काम सुरू आहे. अद्यापही तालुक्‍यातील सुमारे ८३ हजार रेशन कार्डधारक जोडावयाचे आहेत. पीओएस मशिनद्वारे रेशनिंग दुकानांवरही कॅशलेस व्यवहार सुरू करण्यात अडथळा येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, ज्या लोकांनी अद्यापही आपली नावे आधार लिंकशी जोडलेली नाहीत, त्यांनी तातडीने ती जोडावीत, असे आवाहन पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

रास्त धान्य दुकानावरून वितरित केल्या जाणाऱ्या धान्य पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि काळा बाजार होतो, असा आरोप होतो. त्याला पायबंद घालताना रास्त धान्य दुकानांवरील वितरणामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून रेशनिंग कार्डधारक व्यक्ती आधार कार्ड लिंकशी जोडल्या जात आहेत. तालुक्‍यामध्ये ९७ रास्त धान्य दुकानांवर ४९ हजार २२७ रेशनकार्डधारक आहेत. तालुक्‍यातील २ लाख ५ हजार ९८० लोक त्याचा लाभ घेत आहेत. त्यापैकी केवळ १ लाख २२ हजार ०६९ रेशनकार्डधारक आधार लिंकने जोडले गेले आहेत. रेशन कार्डवरील सर्वच लाभार्थी आधार कार्ड लिंकशी जोडावीत, यासाठी शासनाने या कार्यक्रमाला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत (ता.३०) ही मुदत आहे. ज्या लाभार्थ्यांची आधार कार्ड लिंकशी जोडणी केलेली नाही त्यांना भविष्यामध्ये धान्याचा लाभ मिळविताना अडचणी येण्याची शक्‍यता आहे.