राजापुरातील तेवीस शाळांची दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

राजापूर - शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून तालुक्‍यातील २३ शाळांना नवीन वर्गखोल्यांसह जुन्या नादुरुस्त वर्गखोल्यांची दुरुस्ती आण कंपाऊंड वॉलसाठी निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून याचे आराखड्यांसह अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. 

राजापूर - शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून तालुक्‍यातील २३ शाळांना नवीन वर्गखोल्यांसह जुन्या नादुरुस्त वर्गखोल्यांची दुरुस्ती आण कंपाऊंड वॉलसाठी निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून याचे आराखड्यांसह अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. 

शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासनाकडून निधी दिला जातो. भौतिक सुविधांच्या उभारणीसाठी शाळांकडून स्थानिक ग्रामस्थांसह अनेक दात्यांचे सहकार्य घेवून आवश्‍यक निधीची उभारणी केली जाते. तरीही तालुक्‍यातील अनेक शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. या वर्गखोल्यांच्या छपरांची दुरुस्ती न झाल्याने गळक्‍या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी पालकांसह येथील पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे केली. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती दीपक नागले यांनी तालुक्‍याला भेट देताना गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या समवेत तालुक्‍यातील नादुरुस्त वर्गखोल्या असलेल्या शाळांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी नादुरुस्त छप्परामुळे धोकादायक झालेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता.

जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन वर्गखोलीसह जुन्या वर्गखोलीची दुरुस्ती आणि कंपाऊंड वॉलसाठी निधी मंजूर झाला आहे. नवीन वर्गखोली मंजूर झालेल्या शाळांमध्ये कशेळी नं. २, कशेळी नं. ५, कणेरी, नाणार मराठी नं. १, कोळवणखडी या शाळांचा, तर वर्गखोली वा शाळा दुरुस्तीमध्ये  पाथर्डे, दसूर नं. १, वाडी खुर्द, कोंडसर खुर्द नं. १, नाटे मराठी, मारवेलवाडी, सोलगाव नं. १, देवाचेगोठणे केरावळे, देवाचेगोठणे देऊळवाडी, देवाचेगोठणे सोगमवाडी, देवाचेगोठणे केळंबेकरवाडी, गोवळ नं. १, गोवळ नं. २, गोवळ नं. ३, भालावली नं. १, खरवते नं. २, वाटूळ नं. ३, रूंढे, गोठणेदोनिवडे, कोंढेतड गाडगीळवाडी, ससाळे नं. १, देवीहसोळ नं. ३, देवीहसोळ नं. १ या शाळांचा समावेश आहे. कंपाऊंड वॉल कामासाठी मंजूरी मिळालेल्या शाळांमध्ये कशेळी नं. ४, आडीवरे नं. १, नवेदर लोणवी, मोगरे, धाऊलवल्ली, सोलगाव नं. २, देवाचेगोठणे सोडयेवाडी, देवाचेगोठणे राऊतवाडी, होळी, आडवली नं. ६, गाडगीळवाडी नं. ३, शेडे नं. २, पेंडखळे नं. २, कोंडसर खुर्द नं. १, भालावली नं. ३, कशेळी नं. २, वेत्ये, कोदवली तरळवाडी नं. ३ यांचा समावेश आहे. सर्व शिक्षा अभियानातून निधी मंजूर झालेल्या शाळांमध्ये कशेळी नं. १, देवाचेगोठणे देऊळवाडी, फुफेरे नं. ३ या शाळांचा समावेश आहे.

Web Title: rajapur news school