देवगडात राणेंची तोफ आज धडाडणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

देवगड ः येथील नवनिर्वाचित देवगड -जामसंडे नगरपंचायतीमधील प्रचार शिगेला पोचला आहे. कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक दाखल झाले आहेत. आज येथे सिनेअभिनेते सुशांत शेलार यांनी कॉंग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. दरम्यान, उद्या (ता.24) सायंकाळी 6 वाजता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची येथे सभा होणार आहे.

येथील नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान होत असल्याने उत्साही वातावरण आहे. सोशल मीडियासह घरोघरी प्रचारावर भर देण्यात आला आहे. पक्षांच्या उमेदवारांचा फलक लावून रथासह प्रचार करण्याकडेही कल आहे. तसेच प्रचारात मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत. वाडीवस्तीवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटीही ते घेत आहेत. आज येथील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेते सुशांत शेलार आले होते. त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका साळसकर यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. या वेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेस कार्यकर्ते होते. उद्या सायंकाळी 6 वाजता येथील महाविद्यालय नाक्‍याजवळ कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांची जाहीर सभा होणार आहे. या वेळी माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत उपस्थित राहणार आहेत.

कोकण

सावंतवाडी : शहराच्या बाहेर महामार्गावर प्रवाशांना सोडणाऱ्या खासगी बसचालकांना दणका देण्यासाठी सावंतवाडी तालुका...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

महाड - शहरालगत पी. जी. सिटी संकुलातील गोविंद सागर इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये  आज एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याचा...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - कुवारबाव रेल्वेस्थानक येथे गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालकाच्या पोटात सुरी खुपसून खून झाला होता. या खटल्यात आरोपीला...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017