बाजारपेठ वाचवण्यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

रत्नागिरी - मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कुवारबाव बाजारपेठ उद्‌ध्वस्त करू देणार नाही, असा निर्धार आज व्यापारी संघाच्या बैठकीत करण्यात आला. मिऱ्या ते साळवी स्टॉप भागात रस्ता चौपदरीकरणासाठी वेगळे निकष लावण्यात आले आहेत. तेच निकष हातखंब्यापर्यंत लावले जावेत, असा मुद्दा यावेळी आग्रहपूर्वक मांडण्यात आला. शासनाकडून निर्णय झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. 

उद्या (ता. 21) कुवारबाव येथील जमिनीची मोजणी भूमिअभिलेख आणि महसूल प्रशासनातर्फे होणार आहे. त्यावर आजच्या बैठकीत व्यापाऱ्यांचे धोरण निश्‍चित केले. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील साळवी, कार्याध्यक्ष नीलेश लाड, प्रभाकर खानविलकर, प्रताप सावंतदेसाई, सुधाकर सुर्वे, मिरजोळे सरपंच राजू तोडणकर, दर्शन पवार, श्री. गावडे, श्री. कवितके, भैय्या भोंगले, यांच्यासह शंभरहून अधिक व्यापारी उपस्थित होते. 

मिऱ्या ते हातखंबा मार्ग 45 मीटरचा करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होत आहे. 21 ते 29 मार्च या कालावधीत नाचणे, कुवारबाव, खेडशी, हातखंबा येथील व्यापारी, इमलेधारकांना नोटीस दिली. रुंदीकरणाचा सर्वाधिक फटका कुवारबाव, खेडशीत बसणार आहे. आमच्या घरांवर वरवंटा फिरवून चौपदरीकरण होऊ देणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणात अनेकांचे व्यवसाय उद्‌ध्वस्त होणार आहेत. व्यापाऱ्यांची ही भावना केंद्रापर्यंत मांडण्यात येईल. त्यासाठी सुरवातीला सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल. उद्या होणाऱ्या मोजणीप्रसंगी प्रत्येकाने हजेरी लावून आपले म्हणणे अधिकाऱ्यांपुढे मांडावे, असे नीलेश लाड यांनी सांगितले. 

श्री. सावंतदेसाई म्हणाले,""व्यापाऱ्यांबरोबर खेडशी येथील महालक्ष्मी मंदिरही या महामार्गामध्ये जात आहे. मुंबई-गोवा चौपदरीकरणात हातखंबा येथील दर्ग्याची जागा वाचविण्यात आली आहे. त्याप्रमाणेच आमच्या भावना लक्षात घेऊन महालक्ष्मी मंदिरालाही संरक्षण दिले पाहिजे.'' 

कुवारबाव बाजारपेठ हा भावनिकच नव्हे तर रखरखीत आर्थिक मुद्दा आहे. ती वाचविण्यासाठी सनदशीर मार्गानेच आम्ही प्रयत्न करणार आहोत. 
- राजू तोडणकर, सरपंच मिरजोळे 

Web Title: Rapid movement of the market to save the event