जिल्हाध्यक्षाबाबत दोन दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा राजीनामे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

रत्नागिरी - कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्यातील कॉंग्रेसमधील वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक तालुका पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन दोन दिवसांत प्रदेशाध्यक्षांनी निर्णय न घेतल्यास पदांचा सामुदायिक राजीनामा देऊ, अशा दबावतंत्राचा वापर करीत श्री. राणे यांना पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील कॉंग्रेस जाणीवपूर्वक संपविण्याचा वास जिल्ह्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाला येत आहे, अशी संतप्त भावना कॉंग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

अल्पसंख्याक समितीचे जिल्हाध्यक्ष हॅरिस शेखासन, शहराध्यक्ष राकेश चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर, पदाधिकारी रूपाली सावंत, ऍड. सौ. आगाशे, अनिरुद्ध कांबळे, रशीद साखरकर, हुसेनमिया, श्री. काझी, अशोक वाडेकर, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष दुजाभाव करीत आहेत; परंतु त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्ही सर्व पदाधिकारी नीलेश राणे यांच्याबरोबर आहोत. दोन दिवसांत प्रदेशपातळीवर जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय झाला नाही तर सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामा देऊ. त्याला प्रदेशाध्यक्ष जबाबदार राहतील. जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवी नियुक्ती पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. जिल्हाध्यक्षपदासाठी नीलेश राणे यांच्यासह चारजण इच्छुक आहेत. मात्र, भाई जगताप यांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध केला. त्यामुळे नियुक्ती पुन्हा रखडली. आम्हाला जिल्हाध्यक्ष पाहिजे; मग तो कोणीही असला तरी चालेल. नीलेश राणे त्यासाठी प्रयत्न करीत होते; परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही. एकूणच प्रदेशाध्यक्षांचा जिल्ह्यातील कॉंग्रेसला जाणीवपूर्वक संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

नीलेश राणे यांच्या राजीनामा अस्त्राने जिल्हा कॉंग्रेस हलली आहे. याचा मोठा परिणाम संघटनेवर झाला आहे. जिल्ह्यातील तालुका पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्या या निर्णयाला पाठिंबा देत प्रदेशाध्यक्षांनाच अल्टिमेटम दिला आहे. 

Web Title: ratnagiri congress

टॅग्स