शंभर विद्यार्थ्यांना वर्षभरात सहा लाखांची मदत

शंभर विद्यार्थ्यांना वर्षभरात सहा लाखांची मदत

रत्नागिरी - स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात तीन कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. समाजामुळे मिळालेल्या नफ्यामुळे समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी जाणीवपूर्वक ‘स्वरूप प्रेरणा पाठ्यवृत्ती’ ही नवी योजना पतसंस्थेने आखली आहे. याद्वारे १०० गरजू विद्यार्थ्यांना वर्षभरात सहा लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. संस्थेची कोट्यवधींची आर्थिक उलाढाल समाजाच्या योगदानामुळेच झाली आहे. मोठा नफा झाल्यानंतर सहकाराला साजेशी अशी सामाजिक बांधिलकी जपणे हे आपले कर्तव्य आहे, असे पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन 
यांनी सांगितले.

संस्थेच्या सर्व शाखांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील मजकूर पाहता या निधीची अत्यावश्‍यकता अधोरेखित होत आहे. १०० लाभार्थी विद्यार्थ्यांचे बचत खाते स्वरूपानंद पतसंस्थेच्या शाखेत काढून त्या खात्यामार्फत हा निधी दरमहा दिला जाणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना एसटी पासकरिता, शालेय साहित्यासाठी पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे सामाजिक हेतूने केलेली ही मदत अशा विद्यार्थ्यांना मोलाची ठरणार आहे.

स्वरूपानंद पतसंस्थेने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. बालिकादिनानिमित्त नवजात बालिकांच्या भविष्यासाठी त्यांच्या नावे ठेवलेली ठेव, गावातील शाळांमधील मुलांना देऊ केलेली पुस्तके, मोक्‍याच्या ठिकाणी केलेल्या निवाराशेड, आवश्‍यक त्या गावांमध्ये पाणीपुरवठा, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, सांस्कृतिक व सामाजिक संस्था, शाळांना स्वरूप प्रेरणा निधी असे अनेक उपक्रम यामध्ये सांगता येतील. कौटुंबिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत आहे, अशा विद्यार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. याकरिता उत्पन्नाचे शिफारसपत्र घेतले जाईल. पहिल्या टप्प्यात १०० विद्यार्थ्यांना प्रतिमहा ३०० ते ५०० रुपये अादा केले जातील. सातवी ते नववीपर्यंत प्रतिमहा ३००, तर दहावीपासून पुढील वर्गासाठी ५०० रुपये प्रतिमहा दिले जातील.

अन्य संस्थांनी घ्यावा पुढाकार
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचा आदर्श अन्य संस्थांनीही घ्यावा. केवळ आर्थिक फायदा न घेता ग्रामीण, शहरी भागांतील गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती दिल्यास शिक्षण घेणे सहज शक्‍य होईल. याकरिता चळवळ उभी राहण्याची गरज आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता हा उपक्रम व्यापक झाला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com