संशयित नौकेवर समुद्रातच होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

सुरक्षा कडक - कोस्ट गार्ड, मत्स्य, बंदर विभागही सामील

रत्नागिरी - जिल्ह्याची सागरी सुरक्षा अधिक प्रभावी आणि भक्कम होणार आहे. यापूर्वी पोलिस, सीमाशुल्क यांच्या होणाऱ्या संयुक्त गस्तीऐवजी पोलिस, सीमाशुल्क, कोस्टगार्ड, मत्स्य विभाग, बंदर विभागाचे अधिकारी यांची संयुक्त गस्त होणार आहे. समुद्रात संशयित बोट आढळल्यास तत्काळ तपासणी करून जागेवर कारवाई केली जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सागरी सुरक्षेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

कोकण किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक संवेदनशील आहे. यापूर्वी काही स्फोटके किनारपट्टीवर उतरली गेली होती. त्यानंतर काही वर्षांपूर्वी किनारपट्टीवर एके- ५६ रायफली सापडल्या होत्या. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठीही सागरी मार्गाचा वापर केला होता. त्यामुळे पोलिसांनी सागरी पोलिस ठाण्यांची स्थापना 
करून किनारी भाग सुरक्षित केला आहे. तसेच, चेक पोष्ट उभारण्यात आली आहेत. 

लॅंडिंग पॉइंटवर पोलिस खात्याचे लक्ष आहे. पोलिस, सीमाशुल्क यांची संयुक्त गस्त सुरू आहे. दहा स्पीड बोटी आणि भाड्याने घेतलेल्या नौकांच्या माध्यमातून पोलिसांतर्फे सागरी सुरक्षा केली जाते; परंतु संशयित नौका समुद्रात सापडल्यास त्यांच्यावर कारवाई करताना संबंधित विभागाचे अधिकारी नसल्याने कारवाईत अडथळा येत होता. त्यामुळे संशयितांना पळवाटा होत्या. 

सागरी सुरक्षा अधिक भक्कम व्हावी, यासाठी जिल्हा पोलिसांसह सीमाशुल्क, कोस्टगार्ड, सुरक्षा विभाग, मत्स्य खाते, बंदर विभागाचे अधिकारी यांची संयुक्त गस्त घालण्यात येणार आहे. 

समुद्रात कायद्याचे उल्लंघन करणारा किंवा संशयित बोटीची कायद्याने तपासणी होऊन सर्व सुरक्षा यंत्रणा बरोबर असल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई होणार आहे. या प्रभावी गस्तीमुळे सागरी सुरक्षा मजबूत होईल, असा विश्‍वास आहे.

सागरी सुरक्षेसाठी नुकतीच बैठक झाली. सुरक्षा अधिक मजबूत आणि प्रभावी व्हावी, यासाठी पोलिस आणि सीमाशुल्कऐवजी आता या दोन्ही सुरक्षा एजन्सीबरोबर तटरक्षक दल, मत्स्य, बंदर विभाग या गस्तीत असणार आहेत.
- अभिजित घोरपडे, निवासी जिल्हाधिकारी, रत्नागिरी

Web Title: ratnagiri konkan news crime on suspected boat