विदेशी मद्याच्या ३८४ बाटल्या जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने मोटारीच्या डिकीतून नेण्यात येत असलेल्या विदेशी मद्याच्या ३८४बाटल्या जप्त केल्या. ही दारू वाहतूक करणाऱ्या चालकासह मोटारही ताब्यात घेण्यात आली आहे. 

रत्नागिरी - राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने मोटारीच्या डिकीतून नेण्यात येत असलेल्या विदेशी मद्याच्या ३८४बाटल्या जप्त केल्या. ही दारू वाहतूक करणाऱ्या चालकासह मोटारही ताब्यात घेण्यात आली आहे. 

गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्कच्या पथकाने दुपारी दीडच्या दरम्यान ही कारवाई खेडशी येथे केली. मिळालेल्या माहितीनुसार खेडशी येथे वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी पांढऱ्या रंगाची मोटार (एमएच-०८-सी-५४६४) ही गाडी पथकाने तपासणीसाठी थांबवली. तिची झडती घेतली असता गाडीच्या डिकीत विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. गाडीत विदेशी मद्याचे आठ बॉक्‍स आढळले. प्रत्येक बॉक्‍समध्ये ४८ बाटल्या, अशा एकूण ३८४ बाटल्या सापडल्या. याची किंमत ५३ हजार ७६०, तर गाडीची किंमत १ लाख २० हजार, असा एकूण १ लाख ७३ हजार ७६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी चालक महेंद्र दत्ताराम जाधव (३२, रा. देऊळवाडी, कात्रोळी, चिपळूण) याला ताब्यात घेण्यात आले असून गाडीही जप्त करण्यात आली आहे.  ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद कांबळे, प्रभात सावंत, विजय हातिसकर, वैभव सोनावले, विशाल विचारे, महादेव चौरे, मलिक धोत्रे, अनिता डोंगरे यांनी केली.

Web Title: ratnagiri konkan news foreign wine 384 bottle seized