पोलिस दलातील वाहनांवर जीपीएस - प्रणय अशोक

राजेश शेळके
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - जिल्हा पोलिस दलाने कात टाकली आहे. अत्याधुनिकतेची कास धरत पोलिस दल स्मार्ट होऊ लागले आहे. एफआयआर डायरीमधील नोंदी आता ऑनलाईन झाल्या आहेत. सीसीटीव्ही, सायबर सेल नंतर दलातील सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवली जाणार आहे. एखाद्या घटनेवेळी तत्काळ पोलिस मदत उपलब्ध होणार आहे. व्हाईस कॉल यंत्रणादेखील सुरू केली जाणार आहे. 

रत्नागिरी - जिल्हा पोलिस दलाने कात टाकली आहे. अत्याधुनिकतेची कास धरत पोलिस दल स्मार्ट होऊ लागले आहे. एफआयआर डायरीमधील नोंदी आता ऑनलाईन झाल्या आहेत. सीसीटीव्ही, सायबर सेल नंतर दलातील सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवली जाणार आहे. एखाद्या घटनेवेळी तत्काळ पोलिस मदत उपलब्ध होणार आहे. व्हाईस कॉल यंत्रणादेखील सुरू केली जाणार आहे. 

पोलिसांनी तपासासह, रेकॉर्ड ठेण्यासाठी अत्याधुनिकतेचा वापर सुरू केला आहे. सीपी प्रकल्पाअंतर्गत या सर्व नोंदी ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांची माहिती एका क्‍लिकवर मिळते. पोलिस दलामध्ये सोशल मीडियाचाही मोठा वापर केला जातो.

त्यासाठी वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. गुन्ह्याची आणि गुन्हेगाराची माहिती तत्काळ आदान-प्रदान करता येते. एखादी महत्त्वाची टीप (माहिती) मिळते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्या-त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घातली जाते; पण जिल्ह्यात पहिल्यांदा ई-पेट्रोलिंगचा वापर करण्यात आला. त्याला मुख्यमंत्र्यांनीही दाद दिली होती.

ऑनलाईन फसवणूक वाढल्याने त्याला चाप बसविण्यासाठी सायबर सेल उभारण्यात आली. गुन्ह्यांचे तपासकामासाठी वाहने दिली आहेत; परंतु त्याचा तपासकामांसाठी किती वापर होतो, हा संशोधनाचा विषय आहे; मात्र त्यावरही आता उपाय काढण्यात आला आहे. पोलिस दलातील सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. जेणेकरून प्रत्येक वाहनाचे लोकेशन (ठिकाण) पोलिस नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. एखादी मोठी दुर्घटना किंवा घटना घडल्यास कोणते वाहन जवळपास आहे, याची माहिती मिळून तत्काळ पोलिसांची मदत उपलब्ध होणार आहे. प्रत्येक पंधरा सेकंदाला वाहनांचे नेमके ठिकाण दिसणार असल्याने संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला त्यामध्ये टंगळमंगळ करता येणार नाही. व्हाईस कॉल यंत्रणाही बसविण्यात आली आहे. बिनतारी संदेश यंत्रणा विभागाकडे हा भाग येतो. त्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

पोलिस ठाणे हे पोलिसांचे दुसरे घर आहे. ते अधिक टापटीप आणि अद्ययावत असणे आवश्‍यक आहे. तपासकामांबरोबर लोकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी अत्याधुनिकता अंगीकारत आहोत. सर्वच वाहनांना जीपीआरएस यंत्रणा बसविण्यात येईल. व्हाईस कॉल सिस्टीमही 
बसवली जात आहे. त्याबाबत प्रशिक्षण 
सुरू आहे.
- प्रणय अशोक, जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी