न्यायालयाच्या आवारात पोटावर वार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

रत्नागिरी - मला मरण्यासाठी सेफ जागा आहे... मला मरायचं आहे.. दहा रुपयांसाठी मला मरावं लागतंय.. असे म्हणत शनिवारी येथील न्यायालयाच्या तळमजल्यावर प्रौढाने स्वतःच्या पोटावर सुरीने दोन वार केले. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

चेतन शशिकांत मोहिते (वय ४०, रा. घोसाळकरवाडी-कडवई, ता. संगमेश्‍वर) असे या प्रौढाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास मुख्य न्यायालयाच्या तळमजल्यावर घडली. चेतन मोहिते हे शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या तळमजल्यावर आले होते. हातात प्लास्टिकची पिशवी त्यामध्ये छत्री, वही, सुरा असे साहित्य होते.

तळमजल्यावरील न्यायाधीशांच्या दालनातून बाहेर आलेले सरकारी वकील ॲड. अजित वायकूळ यांना चेतन मोहिते यांनी हातातील पिशवी घेण्यास सांगितले; परंतु अनोळखी व्यक्तीकडून वायकूळ यांनी पिशवी घेतली नाही. एवढ्यातच चेतन मोहिते यांनी पिशवीतून सुरा काढून स्वतःच्या पोटात खुपसला. दोन वारानंतर त्यांच्या हातातील पिशवी खाली पडली व तेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. पडलेला सुरा पुन्हा घेण्यासाठी चेतन त्याहीस्थितीत हालचाल करताना पाहून ॲड. वायकूळ यांनी सुरा पायाने बाजूला सरकवला. या घटनेची माहिती न्यायालयातील न्यायमूर्तींना देण्यात आली. चेतन मोहिते यांच्या पोटात एक सात, तर दुसरी पाच सेंटिमीटर खोल जखम झाली आहे.

मोहिते यांचे कडवई येथे छोटेसे दुकान आहे. चेतन दुकान सांभाळतात. ते सकाळी रत्नागिरीला आले होते. न्यायालयात त्यांचे कोणतेही काम नव्हते. तरीही तेथे येऊन केवळ मरण्यासाठी सेफ जागा आहे, मला मरायचे आहे, असे तेथील लोकांना ते सांगत होते. पोलिसांनी त्यांना विचारले असता दहा रुपयांसाठी मरावं लागते. मला मरायचे, असे ते म्हणत होते. 

रक्ताळलेल्या अवस्थेत चेतन यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहर पोलिसांनी याचा पंचनामा केला. शहर पोलिस ठाण्यात चेतन मोहितेंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी हा प्रकार कळवल्यावर चेतन यांचे वडील शशिकांत मोहिते जिल्हा रुग्णालयात आले. त्यांनी सांगितले की, जीएसटीसंदर्भात माझ्याशी चेतनचे बोलणे झाले होते. वीस लाखांच्या पुढे ज्याचे उत्पन्न असते त्यालाच जीएसटी लागतो, असे चेतनला समजावले होते; परंतु ही माहिती घेण्यासाठी तो रत्नागिरीत आला होता. त्याची कोणाबद्दलही तक्रार नव्हती, याआधी तो असा वागलेला नाही.

दुःखभरी कविता वहीमध्ये
चेतन मोहिते यांच्या पिशवीत एक छोटी वही आढळली. या वहीत काही कौटुंबिक माहिती आणि छोटे छोटे हिशेब लिहिलेले आहेत. वहीच्या एका पानावर अत्यंत दुःखभरी कविता आहे. कवितेच्या तपशिलावरून चेतन यांनी नैराश्‍य येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा तर्क करण्यात आला.