मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरी पालिकेचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

रत्नागिरी - शासनामार्फत साजऱ्या करण्यात आलेल्या पहिल्याच नगर विकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पालिकांचा सन्मान मुंबईत करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रत्नागिरी पालिकेला कोकण विभागातील द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले. नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी अरविंद माळी आणि नगरसेवकांनी हा पुस्कार स्वीकारला. 

महाराष्ट्र शासनाच्या इतिहासात प्रथमच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पालिकांना गौरविण्यात आले. मुंबई-नरीमन पॉइंट येथील यशवंतराव प्रतिष्ठान सभागृहात नगर विकास दिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. राज्यातील उत्तम काम करणाऱ्या पालिकांना सन्मानित करण्यात आले. 

रत्नागिरी पालिकेने केलेल्या कार्याची दखल घेऊन पालिकेचा गौरव करण्यात आला. या वेळी प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुख्याधिकारी अरविंद्र माळी, नगरसेवक संतोष ऊर्फ बंटी कीर, सोहेल मुकादम उपस्थित होते.