‘एसीबी’मुळे अधिकारी, ठेकेदारांचे धाबे दणाणले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

रत्नागिरी - जलयुक्त शिवारच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी सुरू झाल्याने अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. या चौकशीमध्ये टेंडर प्रक्रियेपासून पैसे अदा करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर काय घडले, याची सखोल चौकशी होणार आहे. 

जलयुक्त शिवारच्या कामांमधील भ्रष्टाचाराबाबत ओरड झाल्यानंतर हे प्रकरण आता चौकशीपर्यंत पोचले आहे. भ्रष्टाचाराच्या कथित साखळीमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. यात दोषी ठरणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाण्याची टांगती तलवार आहे.  

राज्यात पाणीटंचाई भासू नये, जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी ठिकठिकाणी सिमेंट नाला बांध, समतल चर, घळीबांध, माती नाला बांध, अनगड दगडी बांध, गॅबियन स्ट्रक्‍चर (बंधारा) अशी बांधकामे काही निवडक जागांवर करण्यात आली आहेत. यासाठी संपूर्ण राज्यभरात ही योजना कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी तालुक्‍यातील पाच गावांची निवड करण्यात येत आहे. परंतु, दापोली, मंडणगड व खेड तालुक्‍यात गेल्या दोन वर्षात झालेल्या या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप युवा सेनेचे नेते योगेश कदम यांनी केला आहे. त्यामुळे या कामांची चौकशी होऊन क्वालिटी कन्ट्रोलच्या माध्यमातून तपासणी होणे आवश्‍यक आहे, अशी मागणी श्री. कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत खेड, दापोलीसह मंडणगड या तीनही तालुक्‍यांतून एसीबीची पथके तपासणीसाठी फिरत आहेत. खेड तालुक्‍यातील खोपी व निळवणे या ठिकाणच्या कामांची तपासणी केल्यानंतर दापोली तालुक्‍यातील वणौशी-पंचनदी, फरारे, ओणणवसे, वाघिवणे, जामगे, तर मंडणगड तालुक्‍यातील पाट, लोकरवण, साखरी या गावांतील कामांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती एसीबीचे अधिकारी सतीश गुरव यांनी दिली आहे.