संगमेश्‍वर-धामणीजवळ ट्रक-मोटारीच्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार

 संगमेश्‍वर-धामणीजवळ ट्रक-मोटारीच्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार

संगमेश्‍वर - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी 7 वाजता ट्रक आणि स्कॉर्पिओ या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले.  दोघांच्याही पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात संगमेश्‍वरजवळच्या धामणी येथे घडला. 

शनिवारपासून जिल्ह्यात महामार्गावर सुरू असलेली अपघातांची मालिका आजही सुरू राहिली असून कालपासून आजपर्यंत एकूण 10 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या सलग सुट्ट्या आल्यामुळे कोकणात येणार्‍या पर्यटक तसेच चाकरमान्यांची संख्या कमालीची वाढली आहे . अशातच महामार्गावर विविध ठिकाणी चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले आहेत. काल मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरनजीक खेरशेत येथे दोन महिला व एक बालिका तर खेड भरणे येथे एका बालकाचा रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर साखरपा येथे मोटारीच्या अपघातात चार अशा आठ जणांचा एकाच दिवशी अंत झालेला असतांना सलग दुसर्‍या दिवशीची सकाळही भीषण अपघाताने सुरु झाली . 

मुंबईहून राजापूर तालुक्यातील काजीर्डा येथे स्कॉर्पिओ (एमएच-05-इक्यू-6504) घेऊन जाणारे रवींद्र विठोबा पवार, रसिका रवींद्र पवार, अनिल विठोबा पवार आणि अपर्णा अनिल पवार यांची मोटार अनिल पवार हे चालवित होते. मोटार धामणी येथे आली असता ट्रकला (एमएच-08-डब्लू-1414) जोरदार धडक बसल्याने आतील सर्वच प्रवासी रक्तबंबाळ झाले.

अपघातस्थळी एकच आरडाओरड सुरू झाली. जवळपासच्या स्थानिक मंडळींनी जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली. नरेंद्र महाराज संस्थेची रुग्णवाहिका  घेऊन चालक प्रसाद सप्रे तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले. उपचारापूर्वीच मोटारचालक रवींद्र आणि अनिल विठोबा पवार हे दोघे सख्खे भाऊ मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. रवींद्र यांची पत्नी रसिका आणि अनिल यांची पत्नी अपर्णा या दोघी गंभीर जखमी असून त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com