पाचल ते झर्ये रस्ता दुरुस्तीसाठी प्रजासत्ताकदिनी साखळी उपोषण

पाचल ते झर्ये रस्ता दुरुस्तीसाठी प्रजासत्ताकदिनी साखळी उपोषण

लांजा - झर्ये गावाला जोडणारा बारा किलोमीटरचा रस्ता तसेच पाचल बाजारपेठ ते कोंडवाडी दरम्यानच्या चार वाड्यांना जोडणारा साडे पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खासदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत रस्त्याला निधी मंजूर झाला आहे. हा निधी अगदी तुटपुंजा असुन अधिक निधीची आवश्यकता आहे. वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठी प्रजासत्ताक दिनी पाचल ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा पाचल कोंडवाडी ग्रामस्त मंडळाने दिला आहे.

कागदोपत्री पाचल बाजारापेठ ते झर्ये हा १२ किलोमीटरचा रस्ता आहे. पण प्रत्यक्षात पाचल बाजारपेठ ते बावकरवाडी, धनगरवाडी, पवारवाडी व कोंडवाडीला जोडणारा साडे पाच किलोमिटर अंतराचाच रस्ता अस्तित्वात आहे. या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. 

आम्हीच कोकणचा विकास केला हे म्हणणार्‍या स्थानिक नेत्यांनी प्रत्यक्ष या रस्त्याची पाहणी करुन विकास केला की नाही ते सांगावे. तात्काळ रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करावे.  या भागात कालव्याचे काम चालु असुन या कामामुळे येथे अवजड वाहनांच्या वाहतुकीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. 

- अनिल चव्हाण, अध्यक्ष, पाचल-कोंडवाडी मंडळ 

गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्याची ही दुरावस्था कायम आहे.  याबाबत जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, स्थानिक आमदार व खासदार यांच्याशी वारंवार ग्रामस्थांनी पत्रव्यवहार केला होता. खासदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या रस्त्यासाठी ९.९८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्यक्षात हा निधी अगदी तुटपुंजा आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अंदाजे १३३.४० लाखांचा निधी आवश्यक आहे. उपलब्ध निधी सह वाढीव निधी उपलब्ध करुन देण्याची पाचल कोंडवाडी मंडळाची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी २६ जानेवारीला साखळी उपोषण करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष मनोहर मांडवकर, सचिव देवेंद्र पवार, सल्लागार मंगेश भोसले, खजिनदार रमेश बावकर, अनंत बामणे, अशोक चव्हाण, विनोद कांबळे, नरेश नेमण, कृष्णा मांडवकर, सखाराम कोकरे, सुनिल गोरुले, राजेश चव्हाण, प्रसाद पवार, गोपाळ पवार, शैलेश पवार व सिताराम बावदाने आदी साखळी उपोषणामध्ये सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com