... डोळ्यांचे पारणे फेडणारे गोल रिंगण

... डोळ्यांचे पारणे फेडणारे गोल रिंगण

रत्नागिरी - वाखरी येथे बाजीराव विहीर परिसरातील गोल, उभे रिंगण पाहण्यासाठी लाखोंची गर्दी जमलेली. दुपारी १ वाजता ज्ञानेश्‍वर माउलींची पालखी व शेकडो दिंड्या आल्या. स्वार असलेला अश्‍व व माऊलींच्या अश्‍वाने दोन-तीन वेळा प्रदक्षिणा घातली आणि माऊलींच्या अश्‍वाच्या पावलांची माती उचलण्यासाठी सारे वारकरी धावले. डोळ्यांचे पारणे फिटेल, असा अविस्मरणीय प्रसंग अजूनही नजरेसमोर तरळतो आहे. लेन्स 
आर्ट रत्नागिरीचे प्रमुख सिद्धेश वैद्य सांगत होते.

लेन्स आर्टतर्फे ‘माऊली मनामनातली’ हे छायाचित्र प्रदर्शन काही वर्ष भरवले जाते. यंदा वाखरी टप्प्यावरील क्षणचित्रे परेश राजिवले, साईप्रसाद पिलणकर, प्रणित कुवळेकर, ईशान वैद्य, 
सचिन झगडे, शुभेश मोरे, अक्षय उकीरडे, अभिषेक खातू व सिद्धेश वैद्य यांनी टिपली.

वैद्य म्हणाले की, रिंगणासाठी सकाळपासूनच मैदानात अलोट गर्दी उसळली. वारकऱ्यांनी जागा पकडल्या होत्या. 
मैदानात उभ्या असलेल्या गाड्या, झाडे यावरसुद्धा लोकांनी जागा अडवून ठेवल्या. जिथे नजर जाईल तिथे माणसांची गर्दी. बायका, पुरुष फुगड्या घालत होते. विविध खेळ सुरू होते. माउलींच्या पालखीसमवेत माउलींच्या अश्‍वाचे मैदानात आगमन झाले आणि सर्व वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पारंपरिक वेशभूषेतील काही वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. रिंगण झाल्यावर पालखीभोवती माउलींचा गजर केला.

माउलींच्या गजरात न्हाऊन निघालो
लाखाहून अधिक वारकरी नाचत, गात, भजनं म्हणत मैदानात होते. नजर ठरत नव्हती एवढी गर्दी असूनसुद्धा कुठेही गोंधळ, वादावादी नव्हती. सर्व वारकरी माऊलींच्या गजरात न्हाऊन निघाले होते. एकमेकांना सांभाळून सोहळा रंगला, असे वैद्य यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com