ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब पित्रे यांचे निधन

दत्तप्रसाद कुलकर्णी
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

देवरुख येथील ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक बाळासाहेब पित्रे (वय 90) यांचे आज सायंकाळी पुणे येथे निधन झाले. 
देवरुख येथील जगप्रसिद्ध सुश्रुत-अॅडलर या ओर्थोपेडिक शल्य चिकित्सा उपकरणे तयार करणाऱ्या नामांकित कंपनीचे ते संस्थापक संचालक होते.

रत्नागिरी -  देवरुख येथील ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक बाळासाहेब पित्रे (वय 90) यांचे आज सायंकाळी पुणे येथे निधन झाले. देवरुख येथील जगप्रसिद्ध सुश्रुत-अॅडलर या ओर्थोपेडिक शल्य चिकित्सा उपकरणे तयार करणाऱ्या नामांकित कंपनीचे ते संस्थापक संचालक होते.

१९७३ पासून सुश्रुत कंपनीच्या कारभाराची सूत्रे सांभाळत त्यांनी अनेक सामाजिक कार्यातही आपला सहयोग दिला. बाळासाहेबांनी हिंदुस्थान लिव्हर, टाटा यांच्या सारख्या नामांकित कंपन्यांमध्येही मानव संसाधन क्षेत्रात ज्येष्ठ पदावर काम केले होते. त्यांच्या कामाच्या पद्धतीने आणि सृजनशील वृत्तीने त्यांनी औद्योगिक क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याकार्तुत्वाने ठसा उमटवला होता. सिद्धी ट्रस्ट, सेंटर फॉर रुरल आंतर्प्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट अँड रिसर्च (CREDAR), देवरुख ललित कला अॅकॅडमी, आकार ऑर्गनायझेशन, अशा विविध माध्यमात कार्यरत सामाजिक संस्थांची स्थापना करून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनाही सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन केले होते. देवरुख मधील अग्रगण्य अशा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचेही ते मानद अध्यक्ष होते. 

पित्रे यांची अंत्ययात्रा उद्या (ता. १३ ) सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या पुणे येथील निवासस्थानातून येथून निघेल.

Web Title: Ratnagiri News Balasaheb Pitre no more