काजू बोंडापासून पौष्टिक कॅन्डीनिर्मिती

मकरंद पटवर्धन
बुधवार, 23 मे 2018

रत्नागिरी - भारतात 25 लाख टन काजू बोंडे वापराविना वाया जातात. या बोंडापासून सरबत व कँडी बनवून भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. जालगाव (ता. दापोली) येथील गीतांजली जोशी या सात वर्षांपासून कँडी बनवत आहेत. याच्या प्रसारासाठी त्या अनेक ठिकाणी त्याचे प्रशिक्षण देतात.

काजू हे कणखर फळपिक असून काजूगराच्या निर्यातीतून भारताला परकीय चलन मिळते. बोंडाचे उत्पादन काजू बीच्या पाचपट होते. ते पुरेसा वापर नसल्याने वाया जाते. काजू बोंड हे अनेक पोषणमूल्यांनी युक्त असून त्यात जीवनसत्व ‘क’चे प्रमाण 255 मिली प्रति 100 ग्रॅम एवढे चांगले आहे. परिपक्व काजू बोंडांपासून काजू बोंड सरबत करावे. राहिलेल्या चोथ्यापासून कँडी तयार करता येते. काजू सिरप 170 रुपये लिटर दराने विक्री होते. सुमारे 5 क्विंटल काजू बोंडांवर प्रक्रिया करून 250 किलो कँडी सौ. जोशी करत आहेत.

खजूराची कृती

रस काढून निघालेल्या बोंडाचे 1 किलो छोटे तुकडे 1 किलो साखर, अर्धा लिटर पाणी घेऊन पाक एकत्र करावेत. 1 किलोस 2 ग्रॅम सायट्रिक आम्ल व अर्धा ग्रॅम सोडियम बेंझोईट टाकावे व झाकून ठेवावे. दुसर्‍या दिवशी पाकातील तुकडे बाहेर काढून पाक 3 तारी करावा व तुकडे पाकात घालावेत. चौथ्या दिवशी तुकडे वाळत घालावेत. दोन दिवस वाळल्यानंतर खजूर तयार होतो.

खजूर वर्षभर टिकतो. 25 रुपये किलो दराने बोंडे मिळतात व खजूर 220 रूपये किलो दराने विक्री होतो. पुण्या-मुंबईत याला चांगली मागणी आहे.

- डॉ. गोविंद जोशी,  माजी शिक्षण संचालक

डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

Web Title: Ratnagiri News candy manufacture from Cashew nut