ग्रीन रिफायनरीसंदर्भात लोकभावनेचा विचार करू - मुख्यमंत्री

राजेंद्र बाईत
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

राजापूर - `नाणार येथील ग्रीन रिफायनरीसंदर्भातील लोकांच्या भावनांचा सकारात्मक विचार करू,` असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. ही माहिती नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांनी  मुंबईतून ‘सकाळ’ला दूरध्वनीवर बोलताना दिली.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज रात्री वर्षा निवासस्थानी श्री. फडणवीस यांची भेट घेऊन नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी केली. यावेळी सर्वांनी अशी भूमिका मांडली, की नाणार रिफायनरीचा अध्यादेश चुकीच्या पद्धतीने काढला आहे. तो आधी रद्द करावा. त्याच वेळी प्रकल्पाविरोधात असलेल्या लोकभावनाही समजून घ्याव्यात.

या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, वैभव नाईक, राजन साळवी आणि सचिव मिलिंद नार्वेकर, भाई सामंत, तसेच रिफायनरीला विरोध करणाऱ्या नऊ गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri News Chief Minister comment on Green Refinery