रत्नागिरी: देवरूखमध्ये सजावटीचे काम करणाऱ्या कलाकाराच्या घराला आग; दीड लाखाचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

येथील कांजिवरा भागात सजावटीचे काम करणारे कलाकार बसन्ना हळमणी यांच्या घरी अंगणात ठेवलेल्या थर्माकोलने आज (गुरुवार) सकाळी नऊ वाजता अचानक पेट घेतला.

देवरुख (जि. रत्नागिरी) - येथील कांजिवरा भागात सजावटीचे काम करणारे कलाकार बसन्ना हळमणी यांच्या घरी अंगणात ठेवलेल्या थर्माकोलने आज (गुरुवार) सकाळी नऊ वाजता अचानक पेट घेतला.

यामध्ये संपूर्ण थर्माकोलसह पत्र्याचा मांडव, घराचा काही भाग, कपाटे, सजावटीचे सामान जळून खाक झाले. महसूल विभाग, पोलिस यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. त्यामध्ये साधारण दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या हळमणी कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप आगीचे नेमके कारण समजले नाही. मात्र शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

फोटो गॅलरी