देवरुखच्या कचरा डंपिंग ग्रांउडमुळे परिसरात दुर्गंधी

प्रमोद हर्डीकर
मंगळवार, 12 जून 2018

साडवली - देवरुख नगरपंचायतीतर्फे गोळा केला जाणारा ओला, सुका कचरा एकत्र करुनच पर्शरामवाडी जवळील डंपिंग ग्रांउडवर टाकला जात आहे. हा कचरा वार्‍यामुळे इतरत्र पसरत आहे. यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

देवरुख पर्शरामवाडी समोरील कावळटेक परीसरात हे डंपिंग ग्राउंड आहे. शहरातील सर्व कचरा या ठिकाणी टाकला जातो. या परिसरात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित आहे. येथील कचरा वाऱ्यामुळे सगळीकडे पसरत आहे. यामुळे पाणी पुरवठा यंत्रणेतही ही दुर्गंधी मिसळली जाऊ शकते. पावसाळ्यात हाच कचरा पाण्याबरोबर वाहत जावून रस्त्यावर येतो. हेच पाणी नदीला मिळते. या कचऱ्यात जनावरेही चरताना दिसतात. त्यामुळे जनावरांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. देवरुख नगरपंचायतीने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 

Web Title: Ratnagiri News Devrukh waste Dumping Ground issue

टॅग्स