मासळी मिळत नसल्याने हर्णे बंदरात अघोषित बंदी

मासळी मिळत नसल्याने हर्णे बंदरात अघोषित बंदी

दाभोळ : कोकण किनाऱ्यानजीकच्या समुद्रात महिन्याभरापूर्वी मिळणाऱ्या बंपर मासळी साठ्याला या आठवड्यात अचानक ओहोटी लागली आहे. गेल्या दहा दिवसांपासून मासळीचा शून्य रिपोर्ट मिळू लागल्याने शेकडो मच्छीमार नौकांनी आता किनाऱ्यावरच राहणे पसंत केले. त्यामुळे 30 ऑक्‍टोबरपासून हर्णै बंदरात अघोषित मच्छीमारी बंदी लागू झाली आहे. बंदरात उभ्या असलेल्या हर्णै, पाजपंढरीसह मुंबईतील शेकडो मच्छीमार नौकावरून आता हे सिद्ध झाले आहे.

माहिनाभरापूर्वी समुद्रात बांगडा, म्हाकुल, सुरमई, पापलेट, हलवा मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याने मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असली, तरी दर अपेक्षेप्रमाणे न मिळाल्याने मच्छीमारांचा यामध्ये फारसा फायदा झाला नाही. त्यानंतर गेले दोन आठवडे मासळी मिळण्याचे प्रमाण पुन्हा मुळ पदावर आले.

गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण एकदम कमी झाले असून मच्छीमार नौकांना अक्षरशः हात हलवत परत यावे लागत आहे. या कालावधीत त्यांच्या जाळ्यांमध्ये कुटीर उद्योगासाठी लागणाऱ्या स्वस्तातील खटवी मासळी व्यतिरिक्त काहीच येत नव्हते. यामुळे मच्छीमार नौका समुद्रात नेण्याचा खर्चही आता मच्छीमारांना परवडेनासा झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेले चार दिवस मच्छीमारी बंद ठेवण्याचा निर्णय अनेक नौकामालकांनी घेतला आहे. मुंबईपासूनच समुद्रात मासळी मिळत नसल्याने मुंबईच्या अनेक नौकांनीही सध्या हर्णै बंदराचा आसरा घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com