गुहागरमध्ये विहिरीत पडलेल्या गव्याला जीवदान

गुहागरमध्ये विहिरीत पडलेल्या गव्याला जीवदान

गुहागर - तालुक्यातील मुंढर-आडीवाडी येथे पडलेल्या गव्याला आज बाहेर काढण्यात आले. क्रेनच्या मदतीने बाहेर काढून त्याला जंगलात सोडून देण्यात आले.

तालुक्यातील मुंढर-आडीवाडी मध्ये दोन गव्यांची रात्रीच्या वेळी रानात मोठी झुंज झाली. यातील एक गवा रेडा गावच्या सीमेवरील समायिक विहिरीत कोसळला. विहीरीत पाणी असल्याने तो वाचवा. पण या विहिरीला पायऱ्या नसल्याने तो विहिरीतच अडकला. जवळपास 650 किलो वजनाचा हा गवा होता.  

जेव्हा हा गवा विहिरीत कोसळला तेव्हा बांधकाम असलेली विहीर सुध्दा रेड्याच्या कोसल्याने हादरली. शुक्रवारी रात्री दहा वाजता  गवा विहिरीत पडला होता. 25 फूट खोल विहिरीतील पाण्यात तो सकाळपर्यत पोहत होता  त्याचा दम तुडला होता. ग्रामस्थांनी सकाळी या गव्याला पाहिले व वनविभागास या संदर्भात कळवले. विहिरीमधील गवारेडा काढणे वनविभागाला  मोठे आव्हानच होते. एक तर तो माणसांना पाहून बिथरत होता.

अखेर गुहागर वनविभागाने क्रेन आणि उपयुक्त सामग्रीसह गव्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. क्रेनच्या माध्यमाने अखेर त्याला बाहेर काढून जीवदान देण्यात आले. वनविभागाला  उशिरा माहिती उपलब्ध झाली तरीही यंत्रणा तातडीने हालली  14 तास पोहून राहून या गव्याने आपला जीव वाचवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com