कोकणची माती दुबईला नेऊन पिकवला हापूस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

खेड - दुबईत हापूस आंबा पण पिकतो, ही स्वप्नवत वाटणारी किमया खरी करून दाखवली आहे खेडचे बशीरभाई हजवानी यांनी. दुबईतील त्यांनी लागवड केलेल्या झाडाला लागलेले आंबे बघायला दुबईतील अनेक लोक त्यांच्या घरी येत आहेत. 

खेड - दुबईत हापूस आंबा पण पिकतो, ही स्वप्नवत वाटणारी किमया खरी करून दाखवली आहे खेडचे बशीरभाई हजवानी यांनी. दुबईतील त्यांनी लागवड केलेल्या झाडाला लागलेले आंबे बघायला दुबईतील अनेक लोक त्यांच्या घरी येत आहेत. 

दुबई म्हणजे वाळवंटी प्रदेश. येथे फळफळावळीचे उत्पादन घेणे आव्हानात्मक होते. दुबईत हापूस पिकवायचा म्हणजे कोकणची लाल माती हवी. ती असेल तरच आंब्याचे झाड लावू शकतो. यासाठी १२ वर्षापूर्वी उधळे तालुका खेडमधून माती दुबईत आणली. सुमारे पाच फूट खोल खड्डे खोदून त्यात माती भरली. लागवडीची आवश्‍यक ती उपाययोजना केल्यानंतर हापूस आब्यांची लागवड केली. आता या झाडांना आंबे धरू लागले आहेत.

आंबे लागलेले पाहिल्यानंतर मला मी दुबईत नसून माझ्या कोकणातील उधळे गावी असल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया बशीरभाई हजवानी यांनी ‘सकाळ’ला दिली. आंबा झाडाबरोबरच नारळ, सीताफळ, चिकू अशाप्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यांनाही फळे ऋतुमानाप्रमाणे येत आहेत. संपूर्ण दुबईत अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे बशीर हजवानींना मनस्वी आनंद होतो. त्यासाठी त्यांनी केलेली मेहनत व त्यांची जिद्द त्यामुळे हे शक्‍य झाले आहे. कोकणात खेडमधील त्यांच्या उधळे गावी त्यांची आंब्यांची बाग आहे. तेथे ज्या प्रकारे आंबा झाडाची काळजी घ्यावी लागते तशीच काळजी ते दुबईतील झाडांची घेतात. म्हणून हे शक्‍य झाले आहे. प्रदेश कोणताही असो, कोकणातील लाल माती असेल तर हापूस नक्की पिकवता येतो हे बशीर हजवानी यांनी दाखवून दिले आहे.

Web Title: Ratnagiri News Hapus Cultivation in Dubai