रायगड, दापोली या विधानसभेच्या जागा आरपीआयला हव्यात

रायगड, दापोली या विधानसभेच्या जागा आरपीआयला हव्यात

रत्नागिरी - आगामी निवडणुका भाजपबरोबर लढणार आहोत. कोकणातून दोन विधानसभा जागांची मागणी केली जाईल. त्यात रायगड व रत्नागिरीतील दापोली विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिली.

कोकण प्रदेशाध्यक्षपदी नियुक्‍ती झाल्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले होते. त्यामध्ये पक्षवाढीसाठीचे नियोजन करण्यात आले. आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. गायकवाड म्हणाले की, कोकणात ताकद नसल्याने जास्त अपेक्षा नाहीत.

दापोलीसाठी उमेदवार निवडताना तो मुंबईस्थित असला तरीही त्याचे मूळ दापोली मतदारसंघात आवश्‍यक आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मेळाव्यात उमेदवार जाहीर केला जाईल. भाजपने पुढील २५ वर्षांचे नियोजन केले आहे. सामान्य माणूस दुखावलेला नाही. सेना-भाजप विरोधात लढले तर नुकसान होईल. त्यांनी एकत्र लढले पाहिजे. आरपीआयचे वाडी-वस्तीवर कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांकडे आर्थिक ताकद नाही. ॲट्रॉसिटी ॲक्‍टमध्ये कोणताही बदल करता येऊ शकत नाही. या कायद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी आरपीआयकडून घेतली जाते. रायगडमध्ये हा फंडा यशस्वी केल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण आवश्‍यक
मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते; मात्र त्यावेळी आरक्षण घेतले नाही. यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मराठा समाजाचीच व्यक्‍ती होती. त्यांना आरक्षण देता आले असते. सध्या आरक्षणावरून राजकारण केले जात आहे. हे आरक्षण भाजपच मिळवून देईल. तसेच भविष्यात सत्तेत भाजपच राहील, असा विश्‍वास श्री. गायकवाड यांनी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com