जालगावात बिनविरोध परंपरेला फाटा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

दाभोळ -  दापोली तालुक्‍यात आदर्श मानल्या जाणाऱ्या जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावच्या निवडणुकीत मोठी चुरस असून शिवसेना व भाजप या दोन राजकीय पक्षांमध्ये या निवडणुकीत काटे की टक्‍कर होण्याची शक्‍यता आहे.

दाभोळ -  दापोली तालुक्‍यात आदर्श मानल्या जाणाऱ्या जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावच्या निवडणुकीत मोठी चुरस असून शिवसेना व भाजप या दोन राजकीय पक्षांमध्ये या निवडणुकीत काटे की टक्‍कर होण्याची शक्‍यता आहे.

गेली अनेक वर्षे जालगाव गावाला बिनविरोध निवडणुकीची परंपरा होती; मात्र आता ही प्रथा काही प्रभागांत बंद झाली असून यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना व भाजपने एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. सरपंचपदाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. यापूर्वी जालगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचेच वर्चस्व होते; मात्र यावेळपासून सरपंचपदासाठी मतदारांना थेट मतदान करता येणार असल्याने सरपंचपदासाठी चुरस 
वाढली आहे. 

या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी युगंधरा विलास धाडवे (भाजप) व श्रुती विनय गोलांबडे (शिवसेना) यांच्यात लढाई होणार आहे. प्रभाग क्रमांक १ मधील ३ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात असून त्यात विनोद आवळे, स्वप्नील भाटकर, प्रथमेश मयेकर, शिवाजी लिंगावळे, मिलिंद शेठ, सचिन साखरकर, उज्ज्वला ठोंबरे व अनघा साबळे रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २ मधून शंकर मांडवकर हे बिनविरोध निवडून आले असून उर्वरित २ जागांसाठी ४ महिला रिंगणात आहेत. त्यात श्रेयसी करमरकर विरुद्ध धनश्री नांदीस्कर व अंकिता जंगम विरुद्ध सुमेधा बोडस यांच्यात लढत होणार आहे.

प्रभाग ३ मधून भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीराम इदाते व राजेंद्र चोरगे यांच्यात तसेच सुवर्णा चोरगे व रीना शिगवण यांच्यात लढत होणार असून साक्षी कदम या बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग ४ मध्ये श्रीराम इदाते व विजय धोपट यांच्यात लढत होणार असून याच प्रभागातून सिद्धी पाते व दीपाली भैरमकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग ५ मधून २ जागांसाठी ५ जणांमध्ये लढत असून अमित आलम, समीर कांबळे, रमेश पाटेकर, अनिल भांबीड, राजेंद्र राळे यांच्यात लढत होणार असून याच प्रभागातील महिला राखीव गटातून रुचिरा पाटेकर व ज्योती भावे यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग ६ मध्ये विकास आवळे व राजेंद्र हांडे आमने-सामने आहेत. वैशाली जाधव बिनविरोध निवडून आल्या आहेत.

वर्चस्व कोणाचे ?
जालगाव येथील निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांपैकी ६ सदस्य बिनविरोध निवडून आले असून ११ जागांसाठी तसेच सरपंचपदासाठी १६ ऑक्‍टोबरला मतदान होणार असून जालगाव ग्रामपंचायतीवर भाजपचे की शिवसेनेचे वर्चस्व राहणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: ratnagiri news Jalgaon Grampanchayat election