पोषणबागेचे जोशी मॉडेल कोकणात फायदेशीर

मकरंद पटवर्धन
मंगळवार, 29 मे 2018

रत्नागिरी - वानर, मोकाट गुरे, कोंबड्यांच्या त्रासापासून संरक्षण करणाऱ्या द्विस्तरीय पोषणबागेचे जोशी मॉडेल कोकणात फायदेशीर आहे. जालगाव (ता. दापोली) येथील कृषीशास्त्रज्ञ व माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद जोशी यांनी हे मॉडेल विकसित केले आहे. यातून कोकणातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.

मोकाट गुरे आणि जंगली श्‍वापदांमुळे कोकणात भाजीपाला शेती संकटात आहे.यावर उपाय म्हणून डॉ. जोशी यांनी पोषणबाग साकारली. त्यांनी सुरवातीला मच्छीमारीचे जाळे, बांबू, 
सिमेंट खांब वापरून शेड बनवली. कायमस्वरूपी शेडसाठी लोखंडी ग्रिल, जाळीचा उपयोग केला.

२० बाय २० फुटाच्या पोषणबागेत खालच्या थरात वांगी, मिरची, भेंडी, माठ, मुळा, पालक, मेथी, कोथिंबीर, घेवडा, चवळी, वाली, पडवळ, टोमॅटो, तोंडली या भाज्यांची आलटून पालटून लागवड केली. वेलवर्गीय भाज्या वरच्या थरात म्हणजे जाळीवर सोडल्या. खते, पाणी आणि पीक संरक्षणाचे कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार योग्य नियोजन केले. यामुळे दैनंदिन भाजीपाल्याची कौटुंबिक गरज भागली, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. डॉ. जोशी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला आहे. 

शाळांमध्ये उपयुक्त
कुपोषणग्रस्त गावांमध्ये तसेच गावांतील बालवाड्या, प्राथमिक शाळांमध्ये शासनाचा पोषण आहार उपक्रम राबविला जातो, तेथे पोषणबागांची निर्मिती करता येऊ शकेल. यातून विद्यार्थ्यांवर भाजीपाला मशागतीचे श्रमसंस्कार होतील, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Joshi Model of Gardening special