सावंतवाडी: अल्पवयीन मुलींना धमकी देणार्‍या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

सावंतवाडी : अल्पवयीन दोघा मुलींना धमकी देवून शरीरसुखाची मागणी करणार्‍या दोघांना आज येथील पोलिसांनी अटक केली. जुबेर बाडीवाले (वय-23) व आफताब मेहत्तर (वय-19) असे त्या दोघांचे नाव आहे.

हा प्रकार करणार्‍या त्या दोघांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी शिवसेना आणि स्वराज्य संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी येथील पोलिस ठाण्यात आज दुपारी ठिय्या घातल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

त्या दोघांवर विनयभंग अ‍ॅट्रासिटीसह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्या (ता.6) त्या दोघांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे असे उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस आणि पोलिस निरिक्षक सुनिल धनावडे यांनी सांगितले.

यात अटक करण्यात आलेला एक संशयित युवक हा पालिकेतील तात्पुरता कामगार आहे. तर दुसरा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ माजली आहे.