कुणबी तितुका मेळवावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांसाठी लढा दिला जाऊ शकतो, हे लक्षात घेऊन सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. गणेशोत्सवासाठी आलेल्या मुंबईस्थित चाकरमान्यांना घेऊन जाकादेवी येथे याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शेकडो समाजबांधवांच्या उपस्थित झालेल्या चर्चासत्रात कुणबी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी संघटित होण्याचा निर्धार करण्यात आला. यासाठी कुणबी समजोन्नती संघाने पुढाकार घेतला आहे. गाव-वाड्यांवर सामाजिक शाखा स्थापन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. 

मुंबई शाखेशी संलग्न रत्नागिरी तालुका कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा यांच्या संयुक्त विद्यमाने जाकादेवी येथील किसान भवनात कुणबी समाजाची भविष्यातील वाटचाल आणि समाज संघटन या विषयावर चर्चा झाली. या वेळी अनिल गराटे तुरेवाले यांच्या रायगड, रत्नागिरी लयभारी या शक्तीतुरा डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी किसन घाणेकर, संदीप गावडे, बाळासाहेब मांईगडे यांनी मार्गदर्शन केले, आप्पासाहेब घाणेकर, चंद्रकांत पाष्टे, सुभाष किंजळे, सूर्यकांत गोताड आदिंनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. संघाची स्थापना १ ऑक्‍टोंबर १९२० ला झाली. मुंबईसह रत्नागिरी तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी समन्वय साधून आणि संघटित होऊन संघाच्या कामाची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार करण्यात आला.

लोकनेते शामराव पेजे समिती अहवालातील समाज एकत्र करणे व शैक्षणिक, वैद्येकीय तसेच समाजाच्या मूळ मागण्यांवर माहिती देण्यात आली. कुणबी समाजोन्नती संघ शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. या निमित्ताने समाजात जागृती करणे, समाजाच्या मूळ समस्यांवर प्रबोधन करणे, वैचारिक बैठक निर्माण करणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, शैक्षणिक वाटचालीची माहिती देणे असे कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

तालुकाध्यक्ष विकासजी पेजे यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी बोटके यांनी समाज दिशाहीन झाला आहे, त्याला शैक्षणीक प्रबोधनाची गरज आहे, यासाठी गाव वाडीवर समाज कार्यकर्ता निर्माण होण्याची गरज आहे. तालुक्‍यातील २१० पैकी ३८ गावातून बैठका झाल्या. यासाठी आपल्याला हात वाढवावे लागतील. तरुणांनी गावात जाऊन बैठका घेतल्या पाहिजेत. सायमन कमिशन, कालेलकर  आयोग, ओबीसी याविषयी तालुका सचिव संजय बैकर यांनी मार्गदर्शन केले. कुणबी युवा महिला व पंचायत समिती सदस्य साक्षी रावणंग यांनी समाज संघटित झाला पाहिजे, असे मत व्यक्‍त केले.

संपूर्ण तालुक्‍यात जनजागृती करणे व संघाच्या गाव-वाड्यांवर सामाजिक शाखा स्थापन करणे हे कुणबी युवा शाखांचे उद्दिष्ट आहे.
-विकास पेजे, तालुकाध्यक्ष