उत्पादन घटल्याने हापूसला सोन्याचा भाव

उत्पादन घटल्याने हापूसला सोन्याचा भाव

रत्नागिरी - उन्हाचा कडाका असला तरीही गुढी पाडव्याच्या मुहूर्ताला वाशीसह पुणे बाजारात हापूसचा तुटवडाच आहे. उत्पादनच कमी असल्याने दरही चढेच असून पुण्यात नगाला दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत.

ऐन पाडव्यात आंब्याला सोन्याचा भाव आहे. पाडव्याच्या पूर्वसंध्येला वीस हजार पेटी वाशीत दाखल झाली होती. शासकीय सुटी असल्याने अनेक बागायतदारांनी रविवारी (ता. १८) वाशीला आंबा पाठविणे पसंत केले आहे; परंतु तो मालही पन्नास टक्‍केच असेल अशी शक्‍यता आहे.

मुहूर्त साधण्यासाठी अनेक बागायतदार एकाचवेळी आंबा पाठवितात. आवक वाढली की त्याचा दरावर परिणाम होतो.
- प्रसन्न पेठे,
बागायतदार

साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून गुढी पाडव्याची ओळख आहे. पंधरा वर्षांपूर्वी हाच मुहूर्त धरुन बागायतदार आंबा मुंबईच्या बाजारात पाठवित होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने हंगामाला सुरवात होई. बागायदारांमधील वाढती स्पर्धा आणि आंबा लवकर गेला की दर चांगला मिळतो या आशेमुळे वाशीतील हापूसची आवक फेब्रुवारीतच होऊ लागली आहे. त्यात निसर्गाची चक्रेही फिरल्याने पोषक स्थिती निर्माण होत आहे. गेले काही वर्षे सुरू असलेले चक्र यावर्षी थांबले आहे. 

रविवारी सुटी असल्याने माल कमी आला आहे. सोमवारी आवक वाढेल; मात्र गतवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्‍के आवक घटली आहे. दक्षिणेकडील आंबाही कमी असल्याने त्याचा हापूसला फायदा होईल.
-संजय पानसरे
, वाशी

मागील पंधरा वर्षात प्रथमच पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात तयार आणि कच्च्या मालाचा तुटवडा आहे. फेब्रुवारीमध्ये माल पंचवीस टक्‍केच आंबा गेला. मार्चमध्येही गतवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्‍केच आवक झाली आहे. सुरवातीला मिळालेला पेटीचा दर आजही कायम आहे. वाशी पाठोपाठ पुण्यातही आंब्याला चांगले मार्केट मिळत आहे. सध्या पुण्यात ग्राहकांना आंब्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. डझनाला १८०० ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. चार ते सहा डझनाची पेटी ४ ते ६ हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. नगाला दीडशे ते दोनशे रुपये आंबा मोजावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com