मालगुंड पॅटर्न सेनेला ठरणार डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी -  तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा चांगलाच धुरळा उडू लागला आहे. एकूण २९ ग्रामपंचायतीसाठीच्या २५३ सदस्यांपैकी १०४ जागी, सरपंचपदासाठीचे ७ बिनविरोध निवडून आल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. २७ पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर सेनेचा झेंडा फडकेल असा विश्‍वास आहे. परंतु मालगुंड ग्रामपंचायतीतील राजकीय परिस्थितीने सेनेच्या फुग्याची हवा निघण्याची शक्‍यता आहे. सर्वपक्षीय लोक एका बाजूला आणि सेना एका बाजूला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मालगुंड पॅटर्न सेनेला धोकादायक ठरण्याची शक्‍यता आहे.    

शिवसेनेचे निर्विवाद राजकीय वर्चस्व असणारा रत्नागिरी तालुका आहे. काही ठराविक ग्रामपंचायती सोडल्या तर सर्व ग्रामपंचायती सेनेच्या ताब्यात आहेत. आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीवरही सेनेचा वरचष्मा आहे. त्याचे विकेंद्रीकरण करून ग्रामीण भागामध्ये सेनेने पाय पसरुन ‘वर्चस्वाचा पाया’ मजबुत केला आहे. आमदार उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सेनेशी दोन हात करून सेनेच्या खिशातील ग्रामपंचायती खेचण्याची धम्मक त्यांच्यात होती. गेल्या विधानसभेला ते शिवसेनेत गेल्याने सेनेचे बळ दुप्पट झाले. तालुक्‍यात सेनेला प्रबळ विरोधकच राहिलेला नाही. सेनेने एकहाती निवडणुकीसाठीचे काम सुरू ठेवले आहे. उर्वरित पक्षांना उमेदवार मिळण्याचेच वांदे झाले आहेत. कारण त्यांचा राजकीय प्रभाव नाही. 

शिवसेनेने मजबूत संघटनाच्या जोरावर २९ पैकी २७ ग्रामपंचायतीवर सेनेचा सरपंच बसेल असा दावा केला आहे. ५ तारीख अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. तोवर आणखी काही सदस्य आणि सरपंच बिनविरोध होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये वेगळेच राजकीय समिकरण जुळले आहे. या समिकरणाने सेनेलाली चिंता लागुन राहिली आहे. सेनेला टक्कर देण्यासाठी वेगळी राजकीय मोट बांधली गेली आहे.

कोन्ही काही राजकीय खेळी केली तरी काही फरक पडत नाही. शिवसेना तालुक्‍यात भक्कम आहे. प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये सेनेचे निष्ठेचे रक्त सळसळत आहे. त्याचे रुपांतर मतदानामध्ये होणार याची खात्री आहे. आम्ही २९ पैकी २७ ग्रामपंचायीवर आमचा सरपंच बसवू.
- उदय सामंत, आमदार, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ