#MonsoonTourism हिरव्यागार डोंगरातून फेसाळणारा प्रपात

#MonsoonTourism हिरव्यागार डोंगरातून फेसाळणारा प्रपात

देवरूख - संततधार पावसाने तालुक्‍यातील निसर्ग बहरला आहे. डोंगरदऱ्यांनी हिरवागार शालू पांघरला असून त्यात फेसाळत वाहणारे धबधबे पाहण्यासाठी आणि कोकणातील निसर्गाची अनुभूती अनुभवण्यासाठी सध्या पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटकांची पावले संगमेश्‍वर तालुक्‍यात वळत आहेत. तालुक्‍यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्‍वरला भाविकांची गर्दी दिवसागणिक वाढत आहे. मार्लेश्‍वर पर्यटकांनी फुलून गेल्याचे चित्र आहे.

गेला महिनाभर पडणारा पाऊस निसर्गासाठी वरदान ठरला आहे. कोकणात सर्वत्र हिरवाई पसरली आहे. याच नयनरम्य निसर्गात खळाळत, फेसाळून वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे म्हणजे कोकणच्या सौंदर्याला चार चांद लावत आहेत. असे मनमोहक रूप अनुभवण्यासाठी पर्यटक तालुक्‍यात मोठ्या संख्येने येत आहेत. 

मार्लेश्‍वरचा धारेश्‍वर धबधबा सध्या जोमात प्रवाहित झाला आहे. सह्यकड्यावरून पडणारा हा धबधबा आणि सह्याद्रीच्य माथ्यावरील हेच सौंदर्य अनुभवण्यासाठी देवदर्शनासाठी मार्लेश्‍वरातील गर्दी वाढली आहे. मार्लेश्‍वरला उन्हाळी हंगामात दीड लाखांहून अधिक पर्यटक आले होते. यावेळी पावसाळी हंगामात हा आकडा २ लाखांच्या घरात जाणार आहे. 

मार्लेश्‍वरचा निसर्ग दरवर्षी आम्हाला साद घालतो. हिरवेगार डोंगर, फेसाळत वाहणारा धबधबा, शेजारीच स्वयंभू देवस्थान आणि मुसळधार पाऊस हे दृश्‍य कोकणात अनुभवता येते. यामुळे आम्ही दरवर्षी न चुकता पावसाळ्यात येथे भेट देतो.
- विलास रायकर,
कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com