मुंबई ते कोसुंब ३१८ किलोमीटरची दाैड

प्रमोद हर्डीकर
गुरुवार, 7 जून 2018

साडवली - मुंबई शहरात नोकरी निमित्ताने रहात असलेल्या राहूल रमाकांत जाधव याने कोसुंब गावच्या ओढीने चक्क धावत ३१८ किलोमीटरचे अंतर धावत पार केले.

साडवली - मुंबई शहरात नोकरी निमित्ताने रहात असलेल्या राहूल रमाकांत जाधव याने कोसुंब गावच्या ओढीने चक्क धावत ३१८ किलोमीटरचे अंतर धावत पार केले.

राहूल जाधव हा तरुण भायखळा येथे वास्तव्यास आहे. कोसुंब गावी जावून सुट्टी घालवावी या हेतुने पट्टीचा धावपटु असलेल्या राहूलने मुंबई सीएसटी येथून एक जूनला धावायला सुरुवात केली. आवश्यक वस्तु सॅकमध्ये घेवून राहूलने ही दौड सुरु केली.
पनवेल, नागोठणे, माणगाव, पोलादपूर, खेड, सावर्डे या ठिकाणी रात्रीचा मुक्काम करुन राहुलने सात जूनला कोसुंब गाठले. कोसुंब गावात जुगाई क्रीडा मंडळातर्फे राहुलचे स्वागत करण्यात आले.

यावेळी राहुलने आपण याआधी पुणे - मुंबई दौड २७ तासात केली होती. मुंबई कोसुंब प्रवासात आपल्याला फारसा त्रास झाला नाही. आता १६ जुलै रोजी मुंबई ते दिल्ली हे एक हजार ४३५ किलोमीटरचे अंतर २५ दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राहुलने सांगितले.

व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांसाठी मी समुपदेशन करत असुन धावण्याचा या प्रकारातून सुद्धा व्यसनाचे विचार बाजूला होवू शकतात असेही राहुलने सांगितले.
 

Web Title: Ratnagiri News Mubai to Kosumb 318 KM Running by Rahul Jadhav