सुभाष देसाईंच्या घोषणेवर नितेश राणेंचे ट्विट

सुभाष देसाईंच्या घोषणेवर नितेश राणेंचे ट्विट

नाणार - नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ही घोषणा केली. तर दुसरीकडे जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करत असल्याची उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी घोषणा केली आहे. दरम्यान या घोषणेवर आमदार नितेश राणे आणि धनंजय मुंडे यांनी टिका केली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणार दौऱ्यावर आहेत. तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष होते. 

विकासासाठी प्रकल्प आणायचा असेल, आणि तो प्रकल्प विनाशकारी नसेल तर तो गुजरात न्या. नाणारमध्ये नको. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी प्रकल्प कोकणात नको असेल तर तो नागपूर आणा अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून तो खूशाल नागपूर नेण्यात यावा. प्रकल्पाच्या माध्यामातून पैशाच्या राशी नाणार येथे ओतल्या तरी येथील शिवरायांचा मावळा विकला जाणार नाही, यासाठी केवळ नाणारच नव्हे तर जैतापूरही गुजरात न्यावे

- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

नाणारमध्ये होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. भाजपप्रणीत सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने, प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शविला आहे, त्यामुळे नाणार प्रकल्पासंदर्भात उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करून, शिवसेनेने आपली भूमिका कृतीतूनही स्पष्ट करावी अशी अपेक्षा नाणारवासियांची व्यक्त केली होती. 

मध्यतंरी उद्धव ठाकरे परदेशात असताना केंद्र सरकारने शिवसेनेला अंधारात ठेऊन, सौदी अरेबियातल्या कंपनीबरोबर या प्रकल्पासाठी कराराला मंजुरी दिली. त्यामुळे चिडलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. त्याआधी हा प्रकल्प बळजबरीने राबवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण मंत्रीपद सोडू अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात घेतली होती.

दरम्यान, या प्रकल्पावर शिवसेनेच्या भूमिकेवर आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे व सुभाष देसाई यांच्यावर टिका केली आहे. 

देसाईंनी नोटिफिकेशन रद्द करण्याबाबतचे मत व्यक्त केले आहे. ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, सरकारचे मत नाही. नोटिफिकेशन रद्द करण्याचा अधिकार फक्त हाय पॉवर कमिटीला आहे. नोटिफिकेशन रद्द करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव कमिटी समोर अध्याप आलेला नाही

- नितेश राणे, आमदार

नाणारमधील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर नितेश राणे यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.  ट्विटमध्ये ते म्हणतात, नटसम्राट नाणार ला आले .. बडबडले..आणि निघुन गेले !!! कोकणी जनतेला काय मिळाल.. बाबाजी का टुल्लू !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com