नवाथे कन्स्ट्रक्‍शनच्या दोन मालमत्तांचा लिलाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

रत्नागिरी - ‘युटोपिया’ (मिनी लवासा) गृहप्रकल्प राबविण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या महेश गोविंद नवाथे यांना ग्राहक मंचाने दणका दिला. नवाथे यांच्या मालमत्तेचा लिलाव करून तक्रादाराचे देणे द्यावे, असे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाकडून त्याची कार्यवाही सुरू झाली. खेडशी आणि रहाटागर येथील मालमत्ता लिलावाची प्रक्रिया तहसीलदार कार्यालयामार्फत झाल्याचे सांगण्यात आले.  

शहरातील रहाटगर येथील मालमत्तेची लघुउत्तम किंमत ३ कोटी ६१ लाख ६८ हजार आहे. खेडशीतील मालमत्तेची किंमत १ कोटी ८० लाख ११ हजार अशी एकूण ५ कोटी ४१ लाख ७९ हजार एवढी नवाथे यांच्या मालमत्तेची किंमत आहे. त्याच्यावर आज बोली लावून या मालमत्तेचा लिलाव केला.

मात्र तहसील कार्यालयातून याची माहिती मिळू शकलेली नाही. गुंतवणूकदारांकडून फसवणूक झाल्यानंतर नवाथे यांच्यावर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली. त्यांनी गुंतवणूकदारांची १४ कोटी २८ लाख ३८ हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तक्रारदारांचा आकडा वाढेल तशी फसवणुकीची रक्कमही वाढणार आहे. यामध्ये चौदा संचालक असून त्यापैकी चौघा संशयितांना अटक केली होती.

गुंतवणूकदारांना दिलासा
गुंतवणूकदारांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. ग्राहक मंचाने दिलासादायक निर्णय देत नवाथे यांच्या मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाला हे आदेश मिळाल्यानंतर तहसील कार्यालयामार्फत आज रहाटागर आणि खेडशी येथील मालमत्तेची लिलाव प्रक्रिया केल्याचे सांगितले.

Web Title: Ratnagiri News Navathe construction two assets auctioned