निकेत पवारची अमेरिकन रेसलिंगकडे वाटचाल

निकेत पवारची अमेरिकन रेसलिंगकडे वाटचाल

खेड - तालुक्‍यातील चिंचघर वेताळवाडीतील तरुणाने जिद्द व मेहनतीच्या जोरावर सीडब्लूई (कॉन्टीनेन्टल्‌ रेसलिंग एन्टरटेनमेंन्ट) या नामांकित ॲकॅडमीतून थेट अमेरिकेतील रेसलिंग फाईटमध्ये जाण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी यशाची पहिली पायरी त्याने पार केली. गरिबीवर मात करीत नऊ महिन्यांपूर्वी जालंदर येथील ॲकॅडमीत त्याने प्रवेश मिळवला. ही ॲकॅडमी द ग्रेट खली म्हणजेच दिलीपसिंह राणा यांची आहे. येथे खेळाडूंना तयार करून अमेरीकेत रेसलिंग फाईटसाठी पाठविण्यात येतात. 

कोकणच्या लाल मातीतील निकेत तुकाराम पवार याने डब्लूडब्लूईमध्ये जाण्याचा निर्धार केला आहे. सुरवातीला घरातील मंडळींना त्याचा ध्यास थोडासा अतिशयोक्ती वाटत होता. परंतु निकेत मात्र ठाम होता. शहरातील सहजीवन हायस्कुलमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व जालंदरची वाट धरली. त्यापूर्वी त्याने शहरातील ‘माव्हर्ल्स जीममध्ये’ शरीर पिळदार बनविण्यासाठी मेहनत घेतली. तायक्वाँदोमध्ये देखील नऊ बेल्ट प्राप्त केले व यशाची पहिली पायरी पार केली.

निकेतचे वडील तुकाराम पवार मूळ साताराचे. निकेत नऊ महिन्याचा असताना त्याचे निधन झाले. त्यामुळे निकेतची आई रिना पवार या माहेरी आल्या. आजही निकेतची आजी व मामा त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. श्रीमती रिना या चिंचघर-दस्तुरी येथे छोटा व्यवसाय करतात. निकेतने डब्ल्यु डब्ल्यु एफमध्ये जाण्याचा ध्यास घेतला. सातवीपासूनच घराशेजारील भातशेतात सराव केला. उंच उड्या, लांब उड्या, झाडांला दोरी बांधून हेलकावे खाणे असे करू लागला. 

जालंदरमधील सीडब्लूई ॲकॅडमीमध्ये भारतातील १३० विद्यार्थी द ग्रेट खली यांच्या मार्गदर्शनाखाली रोज पहाटे तीन वाजल्यापासून सराव करतात. या विद्यार्थ्यांमध्येच फाईट खेळवल्या जातात. सुमारे पंचवीस फाईट खेळल्यावर निवड होते. 

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जांच्या खेळाडूसोबत लढावे लागते. तेथे विजयी झाल्यास अमेरिकेतील रेसलिंग फाईटमध्ये सामिल होता येते. निकेतने ॲकॅडमीतील पंचवीस पैकी पाच फाईटवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पुढील सहा महिन्यात जिंकत गेल्यास निकेतला आंतरराष्ट्रीय खेळाडू सोबत खेळण्याची संधी मिळेल. बिहारचा समीर, पंजाबचा क्रॉस बॉण्ड आणि राजस्थानचा गोपाल यांना निकेतने पाणी पाजले आहे. 
 

जालंदरमध्ये खली सरांचे आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळते. येथील सराव खुपच मेहनतीचा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच मी माझ्या स्वप्नाला गवसणी घालेन असा आत्मविश्‍वास आहे.’’ 
- निकेत पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com