विनाअनुदानीत शाळातील शिक्षकांचे उत्तरपत्रीका जाळून आंदोलन

विनाअनुदानीत शाळातील शिक्षकांचे उत्तरपत्रीका जाळून आंदोलन

रत्नागिरी - उच्च माध्यमिक विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृति समितीने आज रत्नागिरीतील कोकण विभागिय शिक्षण मंडळासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शिक्षकांनी उत्तर पत्रिकांची प्रतिकात्मक होळी केली.

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तुकड्या, वर्ग यांची अनुदानपत्र यादी, त्यासंबंधी अनुदानाची १०० टक्के आर्थिक तरतूद करून जाहीर करावी व तात्काळ १०० टक्के पगार सुरू करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.  एकदिवशीय धरणे आंदोलन दरम्यान  उत्तरपत्रिकेची प्रतिकात्मक होळी करण्यात आली़. या धरणे आंदोलनाची दखल घेऊन, मागण्या मान्य न झाल्यास २७ फेब्रुवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा राज्य संघटनेने दिला आहे़. 

राज्यभरात विनाअनुदान शाळा-महाविद्यालयात 22,500 शिक्षक आहेत. या सर्वांना पगार सुरू करावा अशी आमची मागणी आहे. उच्च माध्यमिक कृती समिती विनाअनुदानितचे आजचे हे 215 वे आंदोलन आहे. या आंदोलनाचा परिणाम सरकारवर झाला नाही तर आम्ही बोर्डाच्या सर्व कामकाजावर बहिष्कार घालणार आहोत. तसेच आम्ही पेपर तपासणीवर बहिष्कार घालणार आहोत. यानंतरही सरकारला जाग आली नाही, तर येत्या 27 तारखेपासून आझाद मैदान येथे उपोषण करणार आहोत.   
- महेंद्र जाधव,
उच्च माध्यमिक विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृति समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com