देवरुख चोरपर्‍या नाल्यात प्लास्टीकचा कचरा

देवरुख चोरपर्‍या नाल्यात प्लास्टीकचा कचरा

साडवली - देवरुख नगरपंचायत, ओझरे आणि साडवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणारा चोरपर्‍या नाल्यात प्लास्टीकचा कचरा साचला आहे. कचरा टाकणाऱ्या नागरीकांना याबाबत नगरपंचायत, ग्रामपंचायत काय दंड किंवा कारवाई करणार हा मोठा प्रश्नच आहे.

देवरुख नगरपंचायत हद्दीत कचरा उचलण्यासाठी चार घंटागाड्यांची तरतुद केलेली आहे. या गाड्या प्रभागात घराघरातून कचरा गोळा करत आहेत. असे असतानाही चोरपर्‍या नाला परिसरात राहणारे नागरीक प्लास्टिकसह इतर कचरा चोरपर्‍यात टाकत आहेत. यामुळे चोरपर्‍या नाला हे कचर्‍याचे डंपिंग ग्राउंड झाले आहे.

चोरपर्‍या नाला देवरुख नगरपंचायत, साडवली व ओझरे ग्रामपंचायत हद्दीतून जातो. या भागातील नागरीक सगळा कचरा चोरपर्‍यात टाकून देत आहेत. या नागरीकांना नोटीसा पाठवून समज देण्यात यावी,  अशी मागणी होत आहे. हा चोरपर्‍या नाला पुढे सप्तलिंगी नदीला मिळत असल्याने नदी प्रदुषणाचा धोका वाढला आहे. नागरीकांनी आपल्या घरातील कचरा कुठेही फेकताना विचार करावा, असेही आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com