जिल्हांतर्गत बदल्यांसाठी प्राथमिक शिक्षक एकवटले

file photo
file photo

रत्नागिरी : जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या तत्काळ कराव्यात या मागणीसाठी जिल्ह्यातील दुसरा गट सक्रीय झाला आहे. आतापर्यंत बदलीला विरोध करण्यासाठी शिक्षक संघटना सरसावल्या होत्या; परंतु आता बदली हवी असे म्हणणारे शिक्षक एकवटले असून त्यांनी आज (बुधवार) जिल्हापरिषदेपुढे लाक्षणिक उपोषण केले.

सुगम क्षेत्रातील शिक्षक दुर्गम किंवा ग्रामीण क्षेत्रातील शाळांमध्ये काम करण्यास इच्छुक नाही. त्यामुळे शासनाच्या जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांना प्राथमिक शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे. आम्ही अनेक वर्षे ग्रामीण भागात काम करीत आहोत. या निर्णयामुळे न्याय मिळाला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशा भावना व्यक्त केली. परिपूर्ण अभ्यास करुन बदल्यांचा निर्णय घेतला आहे. काही शिक्षकांना ग्रामीण भागात जाऊन काम करायचे नाही. त्यांच्याकडून बदली प्रक्रियेविरोधात शिक्षक संघटनांची समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ग्रामीण भागात काम करणार्‍यांवर अन्याय झाला आहे, याची दखल कधीही कुणीच घेतली नव्हती. अनेक वर्षे ग्रामीण भागात काम करत आलेल्या शिक्षकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी शासनाच्या बदली धोरणाविरोधात काही शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. बदल्या झाल्याच पाहीजेत, असे मत शिक्षकांनी मांडले.

शासनाने ऑनलाईन प्रणालीद्वारे बदली करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत शिक्षक संघटनांनी आंदोलन केले होते; मात्र शिक्षकांमध्येच दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. बदल्यांसाठी सकारात्मक असलेल्या शिक्षकांनीही आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरु केले आहे. आज झालेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला ना नेतृत्व ना कुणी नेता. सुमारे शंभरहून अधिक प्राथमिक शिक्षक त्यात सहभागी झाले. उपोषणाला बसलेल्या शिक्षकांच्या डोक्यात बदली हवीचे संदेश देणारी टोपी प्रत्येकाने परिधान केलेली होती. एकच नारा, बदली हवी...झटकन बदली, पटकन कार्यमुक्ती...बदली आमच्या हक्काची, आहे खरी न्यायाची या घोषणा प्रत्येक टोपीवर होत्या. शासनाची प्रक्रिया पूर्णतः योग्य असून त्याला उपस्थित शिक्षकांनी पाठींबा दिला. याप्रसंगी मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांनी संघटनांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

शासन निर्णयानुसार संवर्ग 1 अंतर्गत विधवा, परित्यक्ता, अपंग कुमारिका, कॅन्सरग्रस्त कर्मचारी, 53 वर्ष पूर्ण केलेले कर्मचारी यांचा समावेश आहे. संवर्ग 2 मध्ये 30 किमीपेक्षा जास्त अंतरावरील पती-पत्नी एकत्रीकरण, संवर्ग 3 मध्ये डोंगराळ व दुर्गम भागातील शिक्षकांचा समावेश आहे. संवर्ग 4 मध्ये गैरसोईच्या ठिकाणी कार्यरत विनंती बदली हवी असणारे शिक्षक यांना तत्काळ कार्यमुक्ती आदेश मिळावा, अशी मागणी केली आहे. जून 2017 मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

कोपर्डी बलात्कार व खून खटल्यासंबंधीची बित्तमबातमी वाचा...

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com