दुसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

रत्नागिरी -  मोसमीपूर्व पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा बसला. बसणी येथे वीज पडून एक महिला जखमी झाली. तेथील तीन घरांचे लाखांचे नुकसान झाले. मुंबई-गोवा महामार्गावर कुवे येथे झाड कोसळले. बाव नदीजवळ दरड कोसळून वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. तीन ते चार ठिकाणी झाडे मुळासह उपटून घरांवर, गाड्यांवर कोसळून नुकसान झाले. जिल्ह्यात सरासरी दोन इंच पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्‍यात २०३ मि.मी. पडला.

काल दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. वेगवान वाऱ्यासह विजाही चमकत होत्या. मुसळधार पावसामुळे जमीन ओली झाल्याने मोठमोठे वृक्ष कोसळत  होते. 

बसणी येथील उज्ज्वला रामदास रावणंग यांच्या घरावर वीज कोसळली. घराच्या छपरातून विजेचा लोळ आतमध्ये आला. आत बसलेल्या सौ. उज्ज्वला जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.  यामध्ये रावणंग यांच्या घराचे ५१ हजार रुपये, तर शेजारी असलेल्या पुरुषोत्तम कृष्णा रावणंग यांच्या घराचे ३९ हजार, किशोर जनार्दन रावणंग यांचे २४ हजारांचे नुकसान झाले. शिरगाव येथे चारचाकी गाडीवर झाड कोसळून नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे काजळी नदी दुथडी भरून वाहत होती. किनारी भागातील लोकांना धोक्‍याचा इशारा दिला होता. सायंकाळी पावसाचा जोर ओसरल्यानंतर नदीचे पाणीही ओसरले होते.

मुंबई-गोवा महामार्गावर कुवे येथे सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान वडाचे झाड गाडीवर कोसळले. झाड उचलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा घटनास्थळी वेळेत दाखल झाली नव्हती. पहिल्याच पावसात यंत्रणेचा बोजवारा उडाला. झाड बाजूला करण्यासाठी उशीर झाल्यामुळे वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. मुचरी येथील संतोष जाधव यांच्या घराचे ७,१०० रुपयांचे, सैतवडे-पालशेत (गुहागर) येथील एका घरावर झाड कोसळून ७,६०० रुपयांचे, रिंगीचीवाडी (राजापूर) येथील पार्वती रांगे यांच्या घरावर झाड कोसळून किरकोळ नुकसान झाले. कोतवडे येथे बाळू सनगरे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. 

   तालुका         पाऊस
--------------------
* मंडणगड      ३७.६६
* दापोली         ३.७१
* खेड           १५.१४
* गुहागर         २५.००
* चिपळूण        ८१.७७
* संगमेश्वर       १०४.०५
* रत्नागिरी        ६०.००
* लांजा          २०३.४
* राजापूर         ७२.८७
--------------------
    एकूण           ६७.११