नाणार प्रकल्प सरकार कसा रेटत आहे हे शिवसेनेला विचारा - राज ठाकरे

राजेंद्र बाईत
गुरुवार, 24 मे 2018

राजापूर - भूसंपादनाचा अध्यादेश रद्द केल्याची घोषणा करून नंतर रिफायनरी प्रकल्पाचा विषय आता संपला आहे असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. तरीही शासन प्रकल्प कसा रेटून नेत आहे. याबाबतचे सर्व प्रश्न शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसह त्यांच्या लोकप्रतिनिधींना विचारा अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली

नाणारवासीयांच्या सोबत राहणार असल्याचा पुनरुच्चार करताना  राज ठाकरे यांनी प्रकल्पाबाबत पुढे काय करायचे हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ठरवू असे सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना नाणारविषयी सेनेच्या असलेल्या दुटप्पी भूमिकेकडेही लक्ष वेधले  

दरम्यान, प्रकल्पग्रस्तांनी आज श्री ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी प्रकलग्रस्तांना सभा,  बैठका घेता येऊ नयेत म्हणून सातत्याने मनाई आदेश लागू करत प्रशासन लोकांचा आवाज दाबत आहे त्याचाही चाैकशी केली जावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाद्वारे राज ठाकरे यांच्याकडे केली. 

यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान काही प्रकल्पग्रस्तांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यावेळी श्री ठाकरे यांनी तुम्ही त्यांनाच मते देत बसा असा चिमटा प्रकल्पग्रस्तांचा काढला.

Web Title: Ratnagiri News Raj Thakare comment