नदी पुनर्भरणामुळे फणशीत तीन लाख लिटर साठा

मकरंद पटवर्धन
सोमवार, 4 जून 2018

रत्नागिरी - महाश्रमदान व गाळ उपशामुळे परटवणे नदी पुनर्भरण प्रकल्पात फणशी येथील बंधाऱ्यात तीन लाख लिटर्स पाणीसाठा झाला. उन्हाळ्यात एवढे पाणी साचल्याने श्रमदान करणाऱ्यांच्या चेहेऱ्यावर हास्य उमटले. शासकीय तंत्रनिकेतनच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी हे शिवधनुष्य पेलले व मोहीम फत्ते केली.

विद्यार्थ्यांनी प्रकल्प म्हणून रीड-बेड तंत्रज्ञान वापरून नाल्याचे पाणी स्वच्छ करण्यात यश मिळवले. त्या वेळी नदीत सांडपाणी जात असल्याचे ध्यानात आले. रत्नागिरीकरांना श्रमदानाचे आवाहन केल्यावर पंधरा दिवसांत दहा टन गाळ काढला.

लोकसहभाग आणि युवाशक्ती एकत्र आली तर काय करू शकते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. प्रशासनाच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा आपला सहभाग, इच्छाशक्ती, आवड या गोष्टी एकत्र आल्यावर काहीही शक्‍य आहे. केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे.
- समीर सरमुकादम

उन्हाळ्याच्या पाणीटंचाईच्या काळात एवढे जलवैभव बघायला मिळणे हे सुद्धा रत्नागिरीकरांचे सुदैवच म्हणावे लागेल. आजचा श्रमदानाचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी ९ वाजल्यापासून कामाला सुरवात झाली. शंभर ते सव्वाशे महिला, पुरुष, विद्यार्थी, स्थानिक रहिवासी, सामाजिक कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला. गाळ काढणे, स्वच्छता अशी ज्याला जमेल त्याने शक्‍य ती मदत केली.

मुलांनी फणशीत लक्षणीय कायापालट केला. मीसुद्धा तासभर कचरा गोळा केला. समाजभानातून अशी उत्तुंग कार्य घडू शकतात. जमलेल्या सर्व मंडळींची प्रेरणा आणि मनोबल खूपच वाढले. हातात कुदळ घेऊन फोटो काढण्यासाठी कोणीच आले नव्हते.
- डॉ. शाश्‍वत शेरे

Web Title: Ratnagiri News River revival Campaign in Phanshi