गर्दीचा अतिरेक, अफवा धोकादायक

गर्दीचा अतिरेक, अफवा धोकादायक

रत्नागिरी - नैसर्गिक आपत्तीत बचावकार्य करणारी टीम प्रशिक्षित हवी. त्यांना साधनसामग्रीचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. लोकांनी गर्दी न करता जागा मोकळी करून द्यायला हवी. धोक्‍यातील व्यक्तीला वाचवण्यासाठी काही इशारे, सूचना केल्या जातात. त्यामुळे लोकांनी गोंगाट करू नये. स्थानिक लोकांच्या मदतीने परिसराची माहिती घेऊन जीवितहानी रोखण्याकरिता प्रयत्न केला जातो,अशी माहिती रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे फिल्ड इनचार्ज गणेश चौघुले, जितेंद्र शिंदे यांनी दिली.

पर्यटकांचा आततायीपणा अनेकदा जिवावर बेततो. धबधबा, पूरस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीत आपण किती क्षमतेने तोंड देऊ शकतो याचा विचार आवश्‍यक असतो. गर्दी व हुल्लडबाजीमुळे रेस्क्‍यू करताना अडथळे येतात. धबधब्याच्या ठिकाणी लोक सेल्फीसाठी पुढेपुढे करतात.

८ जुलैला रत्नदुर्गच्या प्रशिक्षित टीमने सवतकडा येथे १३ जणांचे जीव वाचवले. येथे सुरक्षित पायवाट, चेंजिंग रूम, सुरक्षा गार्डची व्यवस्था केली पाहिजे. त्या दिवशी येथे दुपारी पाणी वाढल्यानंतरही अनेक लोक येत होते. त्या दिवशी किमान दोन हजार पर्यटक तेथे होते.  गर्दीचा अतिरेक होता. लोकांना सूचना करूनही लोक ऐकत नव्हते. पर्यटनस्थळी मौजमजा लुटल्यानंतर जास्त वेळ थांबू नये कारण सातत्याने पर्यटक येत असतात. गर्दीचा अतिरेक झाला तर जीव वाचवताना जीवितहानी होऊ शकते. अफवा पसरवल्या जातात. यामुळे सर्वाधिक गोंधळ होतो. सवतकडा येथे ४ जण वाहून गेल्याची अफवा पसरली. अफवा पसरवू नयेत, असे आवाहन चौघुले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com