"आगोट 'च्या खरेदीसाठी देव्हारे बाजार गर्दीने फुलला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

मंडणगड - तालुक्‍यात आगोटीच्या कामाची लगबग सुरु झाली असून मसाले, सुकी मच्छी, प्लास्टिक खरेदीसाठी मंगळवारच्या देव्हारे आठवडा बाजारात नागरिकांनी गर्दी केल्याने बाजार फुलला. सुकी मासळीला प्रचंड मागणी असल्यामुळे दर काही अंशी वाढला. परतीच्या प्रवासाला निघालेल्या मुंबईकरांनी देव्हारेसह मंडणगड, कुंबळे, म्हाप्रळ येथील आठवडा बाजाराला आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली.

वाढलेल्या महागाईचा फटका सर्व घटकांना बसत असून सर्वच वस्तुंचे भाव वाढले आहेत. पावसापुर्वी सुकी मच्छी, तीखट, मीठ कांदे, अगदी लाकूड फाटा चार महिन्यांकरात साठवून ठेवण्याची मानसीकता आजही कायम आहे. पावसाळ्यातील गरम मसाल्याची बेगमी म्हणून गावठी आणि घाटी मिरची कुटून उत्कृष्ट, तिखट व रुचकर मसाले करण्याच्या तयारीला प्रामुख्याने वेग आला आहे. हल्ली बाजारात मसाल्यासह सर्व वस्तू आयत्या मिळत असल्या तरी अनेक घरांत आजही कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार मसाला तयार करण्यात येतो.

विविध राज्यातील विविध जातींच्या लाल मिरच्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यंदा घाऊक बाजारातील उत्तम मिरचीचे दर 150 ते 200 रुपये किलोवर आहेत. आठवडा बाजारामध्ये स्वस्त समजल्या ठिकाणी यंदा भावात तोलमोल झालेली नाही. सुक्‍या मच्छीचा दर यंदा वाढला असून सहज उपलब्ध असणा-या सुकट व बोंबळाचा दरही किलोसाठी पाचशे रुपयांच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे महिलांना बजेटसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

तालुक्‍यातील अन्य आठवडा बाजार-

बुधवार -  मंडणगड, रविवार - कुंबळे, म्हाप्रळ - शुक्रवार

सुकी मासळी (किलो प्रमाणे) - सुकट 240, कोळंबी 400, बघी 400, बोंबील 500, मच्छि सुकट 400, मांदेली 200

पालेभाजी - मटार 100, टोमॅटो 15, फ्लावर 50, वांगी 20, कोथिंबीर 10 जुडी, कांदे 10, बटाटा 30,

प्लास्टिक कागद - 80 आणि 40 रुपये मीटर

Web Title: Ratnagiri News rush for purchase aagot in Devhare Market