ग्रामदैवत श्री देव भैरीचा 1 मार्चपासून शिमगोत्सव 

ग्रामदैवत श्री देव भैरीचा 1 मार्चपासून शिमगोत्सव 

रत्नागिरी - येथील श्री देव भैरी जोगेश्‍वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्‍वर ट्रस्टतर्फे 1 ते 6 मार्च या काळात पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा होणार आहे. 1 मार्चला धुळवड, 2 ला होळी उभी केली जाणार आहे. प्रथेप्रमाणे शस्त्रसलामी व पोलिस ठाण्यात पूजा अशा वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उत्सव होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी दिली. 

शिमगोत्सवाचा कार्यक्रम असा -
1 मार्चला मध्यरात्री 12 वाजता श्री देव भैरीची पालखी श्री देवी जोगेश्‍वरी भेटीसाठी बाहेर पडेल. दीड वाजता जोगेश्‍वरीची होळी उभी करण्यासाठी पालखी जोगेश्‍वरी मंदिरात जाईल. पहाटे तीन वाजता जोगेश्‍वरी मंदिरातून पालखी झाडगाव सहाणेवरून बंदररोडमार्गे पहाटे 5 वाजता मांडवी भडंग नाका येथे जाईल. तेथून पुढे 2 मार्चला प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, खडपेवठार व अन्य भाग करून गोडीबाव तळ्यावर सकाळी 10 वाजता येईल. नंतर मुरुगवाडा घसरवाट येथे राजेंद्र सुर्वे यांच्या कंपाउंडमध्ये होळी घेण्यासाठी जाईल. तेथून परत होळीचा शेंडा घेऊन दुपारी 3 वाजेपर्यंत झाडगाव येथे सहाणेवर जाऊन होळी उभारण्यात येईल. 
2 मार्चला रात्री 9 वाजता धुळवड साजरी करण्यासाठी निशाण निघतील. रात्री 11.30 वाजता ढमालणीच्या पारावरून निशाणाचे तीन भाग होतील.

राजिवड्यातील चव्हाण यांच्या घराजवळ धुळवड साजरी होईल. 3 मार्चला सकाळी 8 वाजता मांडवी वारंग यांच्या घरापासून पुढे चौगुलेवाडी समुद्रमार्गे पंधरा माड येथून परतून सहाणेजवळील मूळ चौथऱ्यावर दुपारी 12 वाजता येईल व धुळवडीचा कार्यक्रम संपेल. 6 मार्चला दुपारी 1 वाजता पालखी रंगपंचमीसाठी सहाणेवरून निघेल. पोलिस कर्मचाऱ्यांची शस्त्रसलामी घेऊन जोगेश्‍वरी मंदिरातून गाडीतळ येथे साडेतीन वाजता पोहोचेल. नवलाई-पावणाई मंदिर, शहर पोलिस ठाण्यात पालखी जाईल. 11.30 वाजता पालखी नेऊन स्थानापन्न होऊन गाऱ्हाण्याने शिमगोत्सवाची सांगता होईल. 

तीन दिवस सहाणेवर 
3 ते 5 मार्चला दुपारी 1 वाजेपर्यंत श्री देव भैरीची पालखी झाडगाव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी स्थानापन्न असेल. तसेच रात्री 10 नंतर प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीत पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल. 5 मार्चला दुपारी दीड वाजता भैरीची पालखी मुरुगवाड्यात ग्रामप्रदक्षिणा करेल. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com