थिएटर ॲकॅडमीतर्फे एकांकिका स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी -  वोडाफोन व थिएटर ॲकॅडमी (पुणे) आयोजित एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीत होणार आहे. प्राथमिक फेऱ्या २४ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत नाशिक, अहमदनगर, गोवा, कणकवली, रत्नागिरी व पुण्यात होणार आहेत. स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे.

संगीत नाटक हा थिएटर ॲकॅडमीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हा वारसा पुढच्या पिढीत न्यावा, त्यातून एक नव्या दमाचे नाटक निमाण व्हावे, या संकल्पनेतून ‘वोडाफोन रंगसंगीत संगीत व गद्य’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते. पुण्यात २००९ मध्ये सुरू झालेल्या स्पर्धेचा आवाका वाढत गेला. ही स्पर्धा पुण्यापुरती मर्यादित न राहता ही नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, गोवा, कणकवली, रत्नागिरी अशा विविध ठिकाणी होऊ लागली.

महाविद्यालये, नाट्यसंस्था व नाट्यप्रेमींसाठी आयोजित खुल्या एकांकिका स्पर्धेस उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. महाराष्ट्र व गोवा येथील कलाकारांच्या सहभागातून १०० पेक्षा जास्त एकांकिका दरवर्षी सादर होऊ लागल्या. प्राथमिक फेरीसाठीचा निकाल प्रत्येक केंद्रासाठी वेगळा जाहीर करण्यात येईल. पुणे येथील प्राथमिक फेरीच्या निकालानंतर अंतिम फेरीमध्ये प्रवेश निवड झालेल्या एकांकिकेची नावे जाहीर करण्यात येतील. अंतिम फेरी व बक्षीस समारंभ पुण्यात होणार आहे. नाट्यकला व सिनेक्षेत्रातील दिग्गज कलाकार, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आदींच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.