भारताविषयी ब्राझीलमध्ये उत्सुकता

गुहागर ः ‘मोस्ट्राटेक २०१७’मध्ये मिळालेल्या विशेष मानांकनाच्या पारितोषिकासह हृषीकेश भावे आणि साहिल कदम.
गुहागर ः ‘मोस्ट्राटेक २०१७’मध्ये मिळालेल्या विशेष मानांकनाच्या पारितोषिकासह हृषीकेश भावे आणि साहिल कदम.

गुहागर - ब्राझीलमधील मुलांमध्ये असलेले देशप्रेम, शाळेविषयीचे प्रेम क्षणाक्षणाला अनुभवता येत होते. आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांमध्ये आपल्या देशाविषयी कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून सामान्य माणसापासून अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण झटत होता. हे पाहून स्वाभाविक मायदेशाची आठवण झाली आणि ब्राझीलबाबत आम्ही भारावून गेलो, अशी प्रतिक्रिया वेळणेश्‍वर येथील अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली. 

‘मोस्ट्राटेक २०१७’ विज्ञान प्रदर्शनात हृषीकेश भावे आणि साहिल कदम सहभागी झाले. त्यांनी बनविलेल्या ‘ॲग्रिकल्चर विड रिमुव्हर’ या यंत्राला विशेष मानांकन मिळाले. ब्राझीलमधील चार दिवसांच्या वास्तव्याबद्दल ‘सकाळ’शी बोलताना भावे व कदम म्हणाले की, येथील नागरिक स्वच्छतेविषयी आग्रही आहेत. येथील जनता मदत करणारी आहे. ब्राझीलच्या विमानतळावर पाय ठेवल्यानंतर पुन्हा विमानात चढेपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक होते.  प्रदर्शनाच्या ठिकाणी जवळपास एक हजार शालेय विद्यार्थी संवादकाचे काम करत होते. त्यांच्या वागण्याबोलण्यात देशप्रेम ठासून भरलेले होते. 

प्रदर्शनाचा उद्‌घाटन समारंभ आणि पारितोषिक वितरण सोहळा केवळ अर्ध्या तासात संपला. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे, सत्कार करणे, लांबलचक भाषणे हे आपल्याकडे दिसणारे चित्र तेथे दिसले नाही. प्रमुख पाहुण्यांची भाषणे केवळ दीड ते दोन मिनिटात संपली. येथील नागरिकांना भारताविषयी आदर आणि कुतूहल आहे. त्यामुळे आमच्या स्टॉलजवळ सतत ब्राझीलियन लोकांची गर्दी असायची. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com